मुंबई- पीएमसी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी राकेश वाधवा व सारंग वाधवा या दोन्ही आरोपींना नजर कैदेत ठेवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मुंबईतील बांद्रा येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांना नजरकैदेत ठेवण्यात येणार आहे.
वाधवा पिता-पुत्रांना नजरकैदेत ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश हेही वाचा -नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एकसदस्यीय प्रभाग पद्धत
या बरोबरच एचडीआयएल कंपनीची संपत्ती विकून त्यातून मिळणाऱ्या पैशातून पीएमसी बँकेचे बुडीत कर्ज वसूल करावे, असे आदेशही मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एस राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय समिती नेमण्यात येणार आहे. या समितीला त्यांनी केलेल्या कामाचा अहवाल 30 एप्रिलपर्यंत मुंबई उच्च न्यायालयामध्ये सादर करायचा आहे.
हेही वाचा - योगेश सोमण यांच्यावरील कारवाई ही शिक्षणव्यवस्थेच्या शुद्धीकरणासाठी - सचिन सावंत
सारंग वाधवा व राकेश वाधवा यांना त्यांच्या बांद्रा येथील निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्यात येणार आहे. कंपनीच्या संपत्ती विषयीचा व्यवहार हा सुरळीत चालावा व त्यामध्ये कुठलीही अडचण येऊ नये, म्हणून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात यावे, यासाठी लागणारा खर्च वाधवा पिता-पुत्रांनी करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पीएमसी बँक प्रकरणी अगोदरच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून व ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणी आतापर्यंत 19 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रणजीत मोरे व न्यायाधीश सुरेंद्र तायडे यांच्या खंडपीठासमोर बुधवारी ही सुनावणी झाली.