मुंबई - 'आयएनएस खांदेरी' ही अत्याधुनिक पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट झाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज मुंबईत आयएनएस खांदेरी या पाणबुडीचे लोकार्पन केले आहे.
नौदलाची ताकद वाढली.. 'आयएनएस खांदेरी' पाणबुडीचे राजनाथ सिंह यांच्या हस्ते लोकार्पण - INS Khanderi into Indian Navy
'आयएनएस खांदेरी' ही अत्याधुनिक पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट झाली आहे.

'आयएनएस खांदेरी' ही अत्याधुनिक पाणबुडी 67 मीटर लांब व बारा मीटर उंच आहे. पाण्याखाली 350 मीटर खोल ही पाणबुडी जाऊ शकते. तर समुद्रात सलग 6500 नोटिकल्स माईल्स म्हणजेच 12 हजार किलोमीटर चा प्रवास ही पाणबुडी करू शकते. 1565 टन वजन असलेली ह्या पाणबुडीत 11 किलोमीटर लांबीची पाईपलाईन करण्यात आली आहे. 60 किलोमीटर लांब केबल फिटिंग या पाणबुडीत करण्यात आली आहे.
समुद्रात पाण्याखाली सलग 45 दिवस राहण्याची या पाणबुडीची क्षमता असून, यांच्या बांधणीसाठी स्पेशल स्टील वापरण्यात आले आहे. हाय टेनसाईल स्ट्रेंथ स्टील मुले ही पाणबुडी रडार च्या निशाण्यावर येत नाही. या पाणबुडीत 360 बॅटरी सेल्स असून प्रत्येक बॅटरीच वजन 750 किलो एवढे आहे. यात जवळपास 1250 केडब्ल्यू डिझेल इंजिन आहे.