मुंबई - भाजपच्या उमेदवार पूनम महाजन यांच्या प्रचारासाठी थेट राजस्थानमधील उर्दू अकादमीचे संचालक आणि नागोरी समाजाचे पदाधिकारी मुंबईत आले आहेत. पूनम महाजन या मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
पूनम महाजन यांच्या प्रचारासाठी राजस्थानमधील पदाधिकारी मुंबईत - poonam mahajan
भाजपच्या उमेदवार पूनम महाजन यांच्या प्रचारासाठी थेट राजस्थानमधील उर्दू अकादमीचे संचालक आणि नागोरी समाजाचे पदाधिकारी मुंबईत आले आहेत.
मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील कलिना, कुर्ला, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम विभागात मोठ्या प्रमाणामध्ये राजस्थानमधील नागोरी समाज स्थिरावला आहे. मोठ्या प्रमाणावर येथे नागोरी समाजाचे मतदार आहेत. या मतदारसंघात 6 हजाराहून अधिक नागोरी समाजाचे मतदार आहेत. राजस्थानमध्ये असलेला नागोरी समाज हा मोठ्या प्रमाणात भाजपाशी जवळीक साधणारा असून मुंबईत हा समाज हॉटेल, दुग्ध व्यवसाय आदी व्यवसायात एक व्यापारी वर्ग म्हणून ओळख ठेवून आहे. त्यामुळेच राजस्थान उर्दू अकादमीतील बहुतांश पदाधिकारी हे भाजपचे कार्य करत आहेत. पक्षाने दिलेल्या आदेशानंतर मुंबईत उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात पूनम महाजन यांच्या प्रचारासाठी आलो असल्याची माहिती राजस्थानच्या नागोर जिल्ह्याचे भाजप अध्यक्ष मोहमद कासीम अली राठोड यांनी दिली.
मुंबई उत्तर मध्य या लोकसभा मतदारसंघात मोठया प्रमाणात नागोरी समाज आहे. त्यांची मते ही पूनम महाजन यांना मिळावीत यासाठी आम्ही आत्तापर्यंत 7 जण आलो आहोत. यामध्ये कोणी राजस्थानमधील भाजपचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा मंत्री, उपाध्यक्ष आणि कोणी राजस्थान उर्दू अकादमीचे संचालक सदस्य आहेत. आम्ही निवडणूक होईपर्यंत या मतदारसंघात प्रचार करणार असल्याचेही मोहम्मद कासीम अली राठोड यांनी सांगितले.