मुंबई - कोहिनूर मिल व्यवहारासंबंधी ईडीकडून उन्मेष जोशी, राजन शिरोडकर व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची चौकशी केली जात आहे. बुधवारच्या दिवशी राजन शिरोडकर यांना पुन्हा ईडी कार्यालयामध्ये बोलवण्यात आले आहे. राजन शिरोडकर यांना कोहिनूर मिलसंदर्भात काही कागदपत्रे जमा करण्यास सांगण्यात आले होते. या गोष्टीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी...
ईडी कार्यालय परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी हेही वाचा - उन्मेष जोशीसह राजन शिरोडकर चौकशीसाठी पुन्हा ईडी मुख्यालयात
राजन शिरोडकर यांनी म्हटलेलं आहे की, प्रसारमाध्यमांमध्ये ज्या काही बातम्या येत आहेत, त्यामध्ये कुठलेही तथ्य नाही. कोहिनूर मिलमध्ये काही प्रमाणात गुंतवणूक करण्यात आलेली होती, मात्र, काही वर्षांनंतर ही गुंतवणूक काढून घेण्यात आलेली होती. कोहिनूर सिटीएनएल कंपनीत जे काही शेअर्स होते त्यांच्या विक्रीतून नफा झाल्याचेही राजन शिरोडकर यांनी ईडी अधिकाऱ्यांना सांगितल्याचे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - 'ईडी' कार्यालयाचा फलक मराठीत करा; मनसेचे महापालिकेला पत्र
कोहिनूर मिलप्रकरणी उन्मेष जोशी व राजन शिरोडकर यांची सतत चार दिवस चौकशी केली आहे. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना यासंदर्भात चौकशीसाठी गरज पडल्यास पुन्हा कार्यालयात बोलावले जाईल, असे ईडी सूत्रांचे म्हणणे आहे.