मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजची पत्रकार परिषद रद्द करत, योग्य वेळ येईल तेव्हा बोलू, असे सांगितले. काल (गुरूवार) झालेल्या ईडीच्या चौकशीनंतर त्यांनी आज पत्रकार परिषद आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. पण, ते सर्व रद्द करण्यात आले आहे.
योग्य वेळ येईल तेव्हा बोलू.. राज ठाकरेंनी पत्रकार परिषद केली रद्द
राज ठाकरे यांनी आज आयोजित केलेली पत्रकार परिषद आणि पदाधिकाऱ्यांची बैठक रद्द केली.
राज ठाकरे
राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी होणारी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक रद्द करण्यात आली आहे. बैठक रद्द झाली असताना देखील मनसेचे नेते बाळा नांदगावकर व पक्षातील काही पदाधिकारी ठाकरे यांना भेटायला येत आहेत.