मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात केलेल्या रॅली आणि जाहीर सभेचा तपशील द्यावा, असे राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे एकही उमेदवार नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात राज्यात जोरदार प्रचार केला आहे. या सभांना राज ठाकरे यांनी खूप गर्दीही खेचली. राज ठाकरे यांना आता त्यांच्या प्रचारांच्या सभांचा खर्च निवडणुक आयोगाला सादर करावा लागणार आहे.
राज ठाकरेंवर निवडणूक आयोग ना'राज'.. सभांच्या खर्चाचा मागितला तपशील
या सभांना राज ठाकरे यांनी खूप गर्दीही खेचली. राज ठाकरे यांना आता त्यांच्या प्रचारांच्या सभांचा खर्च निवडणुक आयोगाला सादर करावा लागणार आहे.
राज ठाकरे यांचा पक्ष नोंदणीकृत असल्याने त्यांना या सभांच्या खर्चाचा तपशील द्यावा लागणार आहे. त्याबाबतची नोटीस निवडणूक आयोगाने त्यांना दिली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ९० दिवसांच्या आत त्यांना निवडणुकीच्या रॅलीतील खर्चाचा तपशील द्यावा लागणार आहे. मनसेचा एकही उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नसल्याने त्यांच्या सभांचा खर्च नेमक्या कुणाच्या नावावर दाखवायचा, याबाबत निवडणूक आयोगच संभ्रमात असल्याचे वृत्त मध्यंतरी प्रसिद्ध झाले होते. तर, भाजपने हा खर्च मनसेच्या खात्यात दाखवण्यात यावा, अशी मागणी केली होती.