मुंबई - राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळाकडे मनसे प्रमुख राज ठाकरेंनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी पत्रक काढून राज्यातील दुष्काळ आणि बेरोजगारी विषयी चिंता व्यक्त केली आहे. दुष्काळी परिस्थितीवर महाराष्ट्र सैनिक लक्ष ठेऊन आहेत आणि जिथे जिथे सरकारी यंत्रणा दिरंगाई करत आहेत, तिथे तिथे मनसे दणका देत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
दोन्ही विषय इतके गंभीर आहेत की, तमाम मराठी जनांनी जनमताचा रेटा उभारायला हवा आणि त्यासाठी 'महाराष्ट्र दिन' ह्या शिवाय उत्तम दिवस असूच शकत नाही. माझी महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे की, दुर्लक्ष करू नका, गाफिल राहू नका, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.