मुबंई- आम्ही रेल्वेमध्ये महाराष्ट्रातील मुला-मुलींना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी आम्ही आंदोलने केली. गुजराती लोकांनी मागच्या वर्षी युपी, बिहारच्या लोकांना हाकलून दिले. तर, त्या गुजरात्याला भाजपने नेते पद दिले आणि आमच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांनी केले की नेतेपद आम्ही केले की, खटले दाखल केले जातात, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
कल्याणमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते.
महाराजांचे जीवंत इतिहास असलेले गडकिल्ले सुधारा
महाराष्ट्राची ओळख असलेल्या शिवाजी महाराजांच्या नावावर राजकरण करत भाजप-सेनेने शिवस्मारक उभारण्याची घोषणा केली. त्यावेळी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस, सेना पक्षप्रमुख आणि काही नेते समुद्रात जाऊन पूजन केले. आता त्यांना ती जागाही दाखवता येणार नाही, माझे अजूनही ठाम मत आहे, शिवरायांच्या भव्य स्मारकापेक्षा त्यांचा जिवंत इतिहास असलेले गडकिल्ले सुधारा असे, आवाहन राज ठाकरे यांनी सरकारला केले आहे.
कल्याणमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते.
6 हजार 500 कोटींचे काय झाले ?
कल्याण डोंबिवलीसाठी 6 हजार 500 कोटींचे पॅकेज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. कुठे गेलं ते पॅकेज? कल्याण डोंबिवलीचा विकास झाला का? रस्त्यांची अवस्था कशी आहे? असे प्रश्न विचारुन राज ठाकरेंनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
भाजप-सेनेला जे 25 वर्षांत जमले नाही ते मनसेने 5 वर्षांत केले
शिवसेना-भाजप या राजकीय पक्षांना शहरांमध्ये 20-25 वर्षे सत्ता देऊनही शहरात जो विकास घडवता आला नाही. त्यापेक्षाही उत्तम विकासकामे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने फक्त 5 वर्षात करून दाखवली होती.
चिनी वस्तू चालत नाही मग वल्लभभाईंचा पुतळा कसा चालतो
दरम्यानच्या काळात डोकलाममध्ये चिनी सैन्य घुसले म्हणून चिनी वस्तू वापरू नका, असा संदेश फिरत होता. पण, यावेळी चायनिज् फास्टफूड बंद करण्याबाबात कोणीच काही बोलले नाही. एवढेच नाही तर स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणून वल्लभभाई पटेलांचा जो पुतळा उभारण्यात आला तो चिनी लोकांनी बनविलेला कसा चालला..?, असा सवाल यावेळी राज ठाकरेंनी उपस्थित केला.
कलम 370 चा महाराष्ट्राला काय उपयोग
हे सरकार फोल ठरले आहे. त्यांच्याकडे आता कोणताच मुद्दा नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या विकासावर न बोलता आपल्या भाषणांमध्ये केवळ 370 कलमाविषयी बोलतात. 370 कलम रद्द केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. पण, त्याचा महाराष्ट्राला काय उपयोग आहे का, असा सवाल यावेळी राज ठाकरेंनी उपस्थित केला.
स्मार्ट सिटी गेली पाण्यात
केंद्र सरकारने स्मार्ट सिटी नावाने योजना सुरू केली. त्यामध्ये महाराष्ट्रातीलही काही शहरांचा समावेश करण्यात आला. सर्वांना वाटत होते की आता शहराचा विकास होईल. पण, परिस्थीती आणखी बिकट झाली. कारण, केवळ अर्ध्या-पाऊण तासांच्या पावसामुळे अख्खे पुणे शहर पाण्यात गेले. मी माझ्या मित्राला यावरून म्हणालो, तुला कोणी विचारले की तु कोठे राहतो तर स्मार्ट सिटी पुण्यात राहतो असे म्हणू नको, तर पाण्यात राहोतो, असे म्हण. पुढे ठाकरे म्हणाले, शहरातील रस्त्यांत इतके खड्डे आहेत की स्मार्ट सिटी या खड्ड्यांमुळे अनेकांचे जीव जात आहेत.
आम्ही 78 टोलनाके बंद केले, शासनाने 5 वर्षांत एकही टोलनाका बंद केला नाही
भाजप सत्तेत येण्यापूर्वी राज्यातील सर्व टोलनाके बंद करू, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्या आश्वासना केराची टोपली दाखवली. जर मनसे सत्ते नसताना केवळ आंदोलनाच्या जोरावर 78 टोलनाके बंद पाडू शकते. तर राज्य सरकाला एकही टोलनाका बंद करणे का जमले नाही, असा सवाल यावेळी राज ठाकरेंनी उपस्थित केला.
आला राग केला ट्वीट
आजकाल लोकांच्या भावना, लोकांमधील राग मरत चालला आहे. त्यामुळे शासनाविषयी रोष असल्यास राग आला की लोकं तेवढ्या पुरत ट्वीट करतात आणि शांत बसतात. याचाच फायदा सरकार उचलत आहे. आपण शासनाविरोध बोलले हवे, राग व्यक्त करा,शांत बसू नका, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.
प्रबळ विरोधी पक्ष द्या
सरकारला जाब विचारणा कोणी नाही यामुळे सरकारचे मनमानी कारभार सुरू आहे. त्यांना जाब विचारणारे काँग्रेसचे विरोधी पक्ष नेतेच भाजपात गेले, असा टोलाही त्यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांचे नाव न घेता लगावला. सरकारला जाब विचारण्यासाठी आम्हाला प्रबळ विरोधी पक्ष म्हणून निवडूण द्या, असे आवाहन यावेळी राज ठाकरे यांनी केले.