मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 2008 मध्ये मनसे वतीने आंदोलन झाले होते. या आंदोलनाचे पडसाद म्हणून सांगली या ठिकाणी हिंसक आंदोलन झाले होते. या आंदोलनात हिंसा केली गेली. असा आरोप राज ठाकरे यांच्यावर केला होता. तेव्हा सांगली जिल्ह्यात कोकरूड या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला. त्या जुन्या केस प्रकरणी शिराळा येथील न्यायदंडाधिकारी यांच्याकडून 4 फेब्रुवारी या दिवशी बजावलेल्या जामीन पत्र वॉरंट इस्लामपूर सत्र न्यायालयाने कायम ठेवले. ते वॉरंट कायम असल्याने राज ठाकरेंविरुद्धच्या त्या वॉरंट विरोधात आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांनी धाव घेतली आहे. याप्रकरणी न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.
राज ठाकरे यांना अटक: महाराष्ट्रातील परप्रांतीय विरोधात 2008 यावर्षी ठिकठिकाणी आंदोलन मनसेच्या वतीने करण्यात आले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंवर कार्यकर्त्यांना चितावणी दिल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात राज ठाकरे यांना अटक करण्यात आली होती. अटक केल्यानंतर याचा निषेध म्हणून ठिकठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. कथितरित्या सांगलीमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास सांगितल्याचा देखील आरोप केला गेला होता. या अशा आंदोलनामुळेच त्या भागात जमाबंदीचा आदेश लागू केला गेला होता. मात्र जमाबंदीचा आदेश कार्यकर्त्यांनी जुमानला नाही. असा आरोप मनसेच्या विरोधात ठेवला गेला.
दहा जणांवर आरोप पत्र दाखल: जमाबंदीचा आदेश दिल्यानंतर देखील राज ठाकरे तुम्ही पुढे चला, या पद्धतीच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले. त्यामुळे त्यावेळच्या तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी काही कार्यकर्त्यांना अटक देखील केली होती. राज ठाकरे यांनी त्यांना चितावणी दिली. या मुख्य आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा देखील नोंदवला होता. राज ठाकरे यांच्यासोबत इतर दहा जणांवर आरोप पत्र दाखल केले होते.