मुंबई- हवामान खात्याने गुरुवारी मुंबईसह आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाली असून सकाळी 8 ते 9 च्या दरम्यान, कुलाबा परिसरात 24 मि.मी. तर नरिमन पॉईंट परिसरात 19 मिमी नोंद करण्यात आली आहे. मुंबईसह पूर्व उपनगरामध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला; मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पाऊस
हवामान खात्याने गुरुवारी मुंबईसह आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाली असून सकाळी 8 ते 9 च्या दरम्यान, कुलाबा परिसरात 24 मि.मी. तर नरिमन पॉईंट परिसरात 19 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. मात्र, मुंबई उपनगरामध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे.
हवामान खात्याचा अंदाज ठरला खरा; मुंबईमध्ये जोरदार पाऊस
शुक्रवारी सकाळी 8 ते 9 च्या दरम्यान, कुलाबा भागातील कुलाबा पंपिंग स्टेशन परिसरात 24 मि.मी., तर, कुलाबा फायर स्टेशन येथे 24 मिलिमीटर, नरिमन पॉईंट परिसरात 19 मि.मी. नोंद करण्यात आली आहे. मात्र, मुंबई उपनगरामध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. मात्र, मुंबई पूर्व व पश्चिम उपनगरांमध्ये कमी प्रमाणात पाऊस झाल्याची माहीती पालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिली आहे. दरम्यान, मुंबईतील रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत असल्याचही सांगण्यात आलेले आहे.
Last Updated : Jul 3, 2020, 11:35 AM IST