मुंबई - कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे पनवेल आणि मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना रविवारीही मनस्ताप सहन करावा लागत आहे.
कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ रुळाला तडा; हार्बर डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत - railway track
आज सकाळी ९: ५० ला रेल्वे रुळाला तडा गेल्याचे लक्षात आले. रेल्वे प्रशासनाकडून रुळ दुरुस्तीचे काम तत्काळ सुरू करण्यात आले. दुरूस्तीच्या कामाला वेळ लागत असल्याने पनवेलकडं जाणारी वाहतूक सकाळपासूनच ठप्प आहे
हार्बर डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत
आज सकाळी ९: ५०ला रेल्वे रुळाला तडा गेल्याचे लक्षात आले. रेल्वे प्रशासनाकडून रुळ दुरुस्तीचे काम तत्काळ सुरू करण्यात आले. दुरूस्तीच्या कामाला वेळ लागत असल्याने पनवेलकडं जाणारी वाहतूक सकाळपासूनच ठप्प आहे. आज कुर्ला ते पनवेल विशेष लोकल सोडल्या जाणार होत्या. मात्र, रुळ तुटल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. तुटलेल्या या रुळाला जोडण्याचे रेल्वे प्रशासनाकडून मोठे प्रयत्न सुरू आहेत थोड्याच वेळात हे जोडू होईल अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून मिळत आहे.