मुंबई- शहराची लाइफ लाइन समजल्या जाणार्या रेल्वे वाहतुकीत गर्दी व प्रवाशांचा बेशिस्तपणा, यामुळे गर्दी होणे ही नित्याचीच गंभीर समस्या बनली आहे. यावर रेल्वे पोलिसांकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे लोकांनी रेल्वेत कसा प्रवास करावा, कसे चालावे व काही दुर्घटना घटना घडल्यास काय करावे, याविषयी जनजागृती करण्यात येत आहे.
मुंबईकरांनी प्रवासादरम्यान काय करावे, याविषयी रेल्वे पोलिसांकडून जनजागृती मोहिम सुरू - लाईफ लाईन
पोलिस सध्या अपघात व प्रवास करते वेळी लोकांनी काय करावे, याविषयी मार्गदर्शन पत्रक व पोस्टर हातात घेऊन, भोंग्यातून आवाहन करत आहेत. रेल्वे पोलिस जनतेला रेल्वे प्रवासादरम्यान डाव्या बाजूने चालावे, गर्दी झाल्यास काय करावे, यासह इतर मार्गदर्शन करत आहेत. हा कार्यक्रम रोज सायंकाळी मुंबईतील विविध स्थानकात फिरून संपूर्ण एक महिनाभर करण्यात येणार आहे.
मुंबईत मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे स्थानकाभोवती सकाळ व सायंकाळच्या वेळेस वाहतूक कोंडी होते. हे चित्र मुंबईतल्या प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या बाहेर पाहायला मिळते. यामुळे मोठ्या दुर्घटना घडत आहेत. यामुळेच नागरिकांविषयी आपुलकी जपत, एरवी स्टेशनवर व ट्रॅकवर पहारा देणाऱ्या रेल्वे पोलिसांकडून जनजागृती करण्यात येत आहे.