मुंबई:लोकल रेल्वेच्या फेऱ्या आणि संख्या दोन्ही वाढवले पाहिजे. मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर डहाणूपासून तर चर्चगेटपर्यंत रोज तीस लाख लोक ये-जा करतात. तर मध्य रेल्वेमध्ये कर्जत, कसारा टिटवाळा ते बदलापूरपासून छत्रपती शिवाजी टर्मिनस, तर हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल ते छत्रपती शिवाजी टर्मिनस या मार्गावर 40 लाखापेक्षा अधिक प्रवासी रोज प्रवास करतात. एकूण मुंबई उपनगर रेल्वेमध्ये जवळजवळ 70 लाखापेक्षा अधिक प्रवासी रोज प्रवासी करतात. काही सुधार होत असला तरी मात्र त्यांच्या समस्या अद्यापही तशाच आहेत.
अतिरिक्त पलाट वाढवले पाहिजे:विशेष करून कल्याण येथे लोकल रेल्वे किंवा मेल एक्सप्रेस आल्यावर पुण्याहून येणारी आणि नाशिकहून येणारी कोणतीही ट्रेन आली, तर तिला क्रॉस करून यावे लागते. त्याचे कारण डाव्या बाजूने आलेल्या आणि उजव्या बाजूने आलेल्या दोन्ही रेल्वे मार्गावर तातडीने त्यांना पुढे सरळ ठाणे दिशेने जाण्यासाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग नाही. त्यामुळे हे क्रॉस करावे लागते. यामध्ये प्रचंड वेळ जातो. त्याचा परिणाम होतो की, लोकल ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी उसळते. लोकल नियमित धावत नाही. पंधरा ते वीस मिनिटे दर दिवशी उशिराने धावत असतात.
रेल्वेमध्ये सुरक्षा देखील वाढवा:त्यामुळे रेल्वे प्रवासी जे आहेत, त्यांना लोकलची संख्या अधिक असावी, असे वाटते. या संदर्भात महाविद्यालयाचे विद्यार्थी सोहेल आणि रजत यांच्यासोबत ईटीव्ही भारतवतीने संवाद साधला असता त्यांनी सांगितले, की रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी असते. जर रेल्वेची संख्या वाढवली, तर मला वाटते यामध्ये थोडा फरक पडेल असे त्यांनी सांगितले. सुमित कुमार या रेल्वे प्रवासी यांनी सांगितले की, रेल्वेमध्ये पाकीटमार चोर मंडळींची संख्या देखील वाढलेली आहे. त्याच्यामुळे सुरक्षेसंदर्भात देखील रेल्वेने आता अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद करायला पाहिजे.