मुंबईRailway Megablock:10 डिसेंबर 2023 रोजी देखभाल आणि दुरुस्तीच्या कामाकरिता मध्य रेल्वे कडून मेगाब्लॉक करण्यात येणार आहे. (Central and Harbor Railway Megablock) ठाणे ते कल्याणच्या आणि डाऊन दिशेकडील जलद मार्गावर सकाळी 10 वाजून 40 मिनिटे ते दुपारी 3 वाजून 40 मिनिटापर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस या ठिकाणाहून सकाळी 9 वाजून 30 मिनिटे ते दुपारी 2 वाजून 45 मिनिटांपर्यंत ज्या लोकल सुटणार आहेत त्या सर्व जलद लोकल ठाणे आणि कल्याण या दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. यामुळे कळवा मुंब्रा आणि दिवा या रेल्वे स्थानकांवर लोकल ट्रेन काही काळ थांबतील त्याचा परिणाम लोकल ट्रेनवर होणार असून त्या दहा मिनिटे उशिराने धावतील. तर सकाळी 10 वाजून 28 मिनिटे ते दुपारी 3 वाजून 25 मिनिटांपर्यंत कल्याण पासून मुंबईकडे येणाऱ्या जलद लोकल सेवा ठाणे स्थानकापर्यंत धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. नेहमीच्या रेल्वे स्थानकांवर त्या थांबणार नाहीत. दिवा, मुंब्रा आणि कळवा येथे थांबून त्यापुढे मुलुंड स्थानकांवर अप दिशेने वळवण्यात येतील. यामुळे मुंबईकडे येणाऱ्या ट्रेन दहा मिनिटे उशिराने धावतील. (Mumbai Railway Megablock)
'या' रेल्वेगाड्या सहाव्या मार्गावर वळविल्या जातील:मुंबई आणि दादरकडे येणाऱ्या अप दिशेच्या मेल आणि एक्सप्रेस या ट्रेनमध्ये रेल्वेच्या ठाणे आणि विक्रोळी रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सहाव्या मार्गावर वळविण्यात येतील. तर मुंबईवरून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या ठाणे आणि कल्याणच्या फलाट क्रमांक पाचच्या मार्गावर वळवण्यात येतील.