मुंबई -मुंबईच्या उपनगरीय रेल्वेमार्गावर होणाऱ्या एकूण अपघाती मृत्यूंपैकी निम्म्यापेक्षा जास्त मृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना होतात. ( Death at Railway Track Crossing ) गेल्यावर्षी रुळ ओलांडताना लाेकल, मेल-एक्सप्रेसची धडक लागल्याने एक हजार ११४ जणांचा मृत्यु झाला. ( More than one thousand people died at railway track ) मात्र, तरीसुद्धा या अपघात रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन अपयशी ठरत आहे. ( Railway Administration Failed ) आतापर्यत अनेक ठिकाणी रेल्वेची संरक्षण भिंती काम अपूर्ण आहे. त्यामुळे दिवसेंदिवस रेल्वे रूळ ओलांडताना होणाऱ्या अपघाताची संख्या वाढली आहे. याबाबत 'ईटीव्ही भारत'चा हा विशेष अहवाल. ( ETV Bharat Special Report on Death on Railway Track )
या मृत्यूंना जबाबदार कोण?
मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर रूळ ओलांडताना आणि लोकलमधून पडून होणाऱ्या अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे. रूळ ओलांडण्याचे प्रकार रोखण्याचे मोठे आव्हान रेल्वे प्रशासनासमोर आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळ, मध्य व पश्चिम रेल्वेने हे प्रकार रोखण्यासाठी रुळांशेजारी संरक्षक भिंत बांधणे, दोन रुळांच्या मार्गामध्ये संरक्षक जाळी, स्थानकात पादचारी पूल बांधणे, प्रवेशद्वार बांधण्याचे काम केले. मात्र, तरीही गेल्या काही वर्षांमध्ये हे अपघात कमी झालेले नाहीत. २०२१मध्ये रेल्वे रुळ ओलांडताना लोकल तसेच एक्स्प्रेस गाड्यांची धडक बसून आणि लोकलमधून पडून होणाऱ्या अपघातांत वाढ झाली आहे. २०२०मध्ये रूळ ओलांडताना ७३० जणांचा मृत्यू आणि १२९ जखमी झाले हाेते. तर लोकल तसेच एक्सप्रेस गाड्यांतून पडून १७७ जण दगावले तर ३६१ जण जखमी झाले. त्याउलट २०२१ मध्ये अपघातांत वाढ झाली. गेल्या वर्षी रेल्वे रूळ ओलांडताना लोकल तसेच एक्सप्रेस गाड्यांची धडक बसून तब्बल एक हजार ११४ जणांचा मृत्यू झाला. त्यात मध्य रेल्वेवर ७४८ तर पश्चिम रेल्वेवर ३६६ जणांनी आपला जीव गमावला आहे. दर वर्षी या अपघातांची संख्या वाढत जात आहे.
संरक्षण भिंतीच कामाला केव्हा गती मिळणार -