मुंबई - दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी आज मुंबई लोकलने प्रवास करून प्रवाशांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. वडाळा ते मानखुर्द या लोकल प्रवासात शेवाळे यांनी प्रवाशांना रेल्वेच्या कामांची माहिती दिली. तसेच सुरक्षित प्रवासासाठी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले.
महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळेंचा लोकलमध्ये प्रचार; प्रवाशांना मतदान करण्याचे आवाहन - मतदान
महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी आज लोकलने प्रवास करून प्रचार केला. यावेळी त्यांनी ५ वर्षांत 'रेल्वे समिती सदस्य' या नात्याने केलेल्या कामांची माहिती प्रवाशांना दिली आणि २९ एप्रिलला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले.
महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे हे वडाळा येथील एक बैठक आटोपून वडाळा रेल्वे स्थानकावर पोहोचले. तिकीट खिडकीवर जाऊन मानखुर्द स्थानाकापर्यंतचे तिकीट त्यांनी खरेदी केले. यावेळी स्थानकावरील प्रवाशांनी शेवाळे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देत हस्तांदोलन केले. त्यानंतर १२.२४ वाजताच्या पनवेल लोकलमधून त्यांनी प्रवास सुरू केला. या प्रवासात शेवाळे यांनी ५ वर्षांत 'रेल्वे समिती सदस्य' या नात्याने केलेल्या कामांची माहिती प्रवाशांना दिली. यावेळी २९ एप्रिलला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन त्यांनी प्रवाशांना केले. वडाळा येथे सुरू झालेला हा प्रवास मानखुर्द येथे संपला. यावेळी शेवाळे यांच्यासोबत माजी महापौर श्रद्धा जाधव आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
रेल्वे समिती सदस्य या नात्याने रेल्वे प्रवाशांच्या अनेक समस्या सोडविण्याची संधी मला मिळाली. सर्व स्थानकांवर सरकते जिने, वॉटर कुलर, प्लॅटफॉर्मची वाढवलेली उंची अशा अनेक सुविधा गेल्या ५ वर्षांत केल्या. तसेच पनवेल- सीएसटी एलिव्हेटेड कॉरिडॉर, एमयुटीपी अशा अनेक प्रकल्पांच्या माध्यमातून येत्या काळात मुंबई लोकलचा चेहरा बदलणार आहे, असे राहुल शेवाळे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.