महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 23, 2020, 10:01 PM IST

Updated : Aug 24, 2020, 5:14 PM IST

ETV Bharat / state

राहुल गांधी यांनी पक्षाचे नेतृत्व स्वीकारावे - बाळासाहेब थोरात

अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष पद सध्या सोनिया गांधी यांच्याकडे आहे. त्या हे पद कधीही सोडू शकतात, असे संकेत मिळाल्याने देशभरातील काँग्रेस नेत्यांकडून राहुल गांधी यांनी पुन्हा काँग्रेसची धुरा सांभाळावी, अशी मागणी होत आहे.

बाळासाहेब थोरात
बाळासाहेब थोरात

मुंबई- राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारावे. त्यांची गरज केवळ पक्षासाठी नाही, तर देशासाठी आहे, अशी विनंती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राहुल गांधी यांना केली आहे. राहुल गांधी यांचे नेतृत्व हे एक समर्थ नेतृत्व आहे. हेच नेतृत्व देशाला पुढे घेऊन जाणारे आहे. या देशाला तेच समर्थपणे नेतृत्व देऊ शकतात. यासाठी त्यांनी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व आणि अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणी थोरात यांनी एका ट्विटच्या माध्यमातून आणि नंतर राहुल गांधी यांना एक विनंती पत्र पाठवून केली आहे.

माहिती देताना बाळासाहेब थोरात

अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्षपद सध्या सोनिया गांधी यांच्याकडे आहे. त्या हे पद कधीही सोडू शकतात, असे संकेत मिळाल्याने देशभरातील काँग्रेस नेत्यांकडून राहुल गांधी यांनी पुन्हा काँग्रेसची धुरा सांभाळावी, अशी मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर थोरात यांनीही राहुल गांधी यांना विनंती केली आहे. सध्या अध्यक्ष असलेल्या सोनिया गांधी यांनीही आपल्या कार्यकाळात काँग्रेस पक्षाच्या उभारणी संदर्भात आणि पक्षासाठी अत्यंत चांगले काम केलेला आहे. त्या पाहिजे तोपर्यंत अध्यक्ष राहतील, परंतु काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी राहुल गांधी हे तयार झाले पाहिजे. देशाचे एकूणच हित लक्षात घेऊन त्यांनी निर्णय घ्यावा. आम्ही भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत, असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा-सुशांतच्या घरमालकाची सीबीआयकडून चौकशी

Last Updated : Aug 24, 2020, 5:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details