महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Rahul Gandhi in Mumbai : आम्ही द्वेषाच्या बाजारात प्रेमाचं दुकान उघडतो - राहुल गांधी - इंडिया आघाडी बैठक

Rahul Gandhi in Mumbai आम्ही भाजपचा पराभव करणार आहोत. (Rahul Gandhi Reply To Modi) आम्ही शत्रूच्या घरी जातो आणि द्वेषाच्या बाजारात प्रेमाचं दुकान उघडतो. (Rahul Gandhi address to workers) मोदी सरकारने कितीही यंत्रणा कामाला लावू दे, काहीही करू देत, काँग्रेस पक्षाला कोणीही रोखू शकत नाही, असा विश्वास कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केला. (India Aghadi meeting)

Rahul Gandhi Reply To Modi
राहुल गांधी

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 1, 2023, 10:53 PM IST

मुंबईRahul Gandhi in Mumbai : आम्ही भाजपाचा पराभव करणार आहोत. आपल्यासोबत अनेक ज्येष्ठ नेते आहेत. पण सोबतच तुमची साथ आणि सोबत देखील तितकीच महत्त्वाची आहे. (Rahul Gandhi Reply To Modi) तुमच्या ताकदीवरच आपण जिंकणार आहोत. हा काँग्रेस पक्ष आहे. महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष मजबूत आहे कारण काँग्रेस पक्ष विचारधारेचा पक्ष आहे, काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कोणालाही घाबरत नाही, असं म्हणत खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. (India Aghadi meeting)

राहुल गांधींकडून मोदींचा समाचार:आज मुंबईत इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुंबईतील टिळक भवन या काँग्रेसच्या महाराष्ट्र मुख्यालयात राहुल गांधींचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खरपूस समाचार घेतला. हॉटेल ग्रँड हयात येथे इंडिया आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना दादर येथील काँग्रेसच्या टिळक भवन या मुख्यालयात घेऊन गेले. तिथे त्यांचा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

इंग्लंड भारताला काँग्रेसमुक्त करू शकले नाही:काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले की, एकेकाळी जगातील महासत्ता असलेला इंग्लंड 'काँग्रेस-मुक्त भारत' बनवू शकला नाही, तर पंतप्रधान मोदी हे कसे करणार? 2014 साली भारतीय जनता पार्टी सत्तेत आली नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यावेळी मोदींनी काँग्रेसमुक्त भारत करण्याचा नारा दिला होता. असाच काहीसा नारा देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी इंग्लंडने दिला होता. त्यावेळी इंग्लंड महासत्ता होती. महासत्ता इंग्लंड जे करू शकले नाही ते करण्याचा प्रयत्न मोदी करत होते. आता जगातील महासत्ता इंग्लंड भारताला काँग्रेसमुक्त करू शकले नाही, ते मोदी कसे करणार?"

काँग्रेसने इंग्लंडची सत्ता घालवली:राहुल गांधी पुढे म्हणाले, जगातील महासत्ता आज अमेरिका आहे. त्यावेळी इंग्लंड महासत्ता होती. इंग्लंड काँग्रेसला पुसून टाकू शकली नाही. उलट काँग्रेसने इंग्लंडची सत्ता घालवली. मोदींना वाटत त्यांचे आणि अदानीचे संबंध काँग्रेसला संपवतील. त्यांना वाटतय की अदानींचा पैसा काँग्रेस पक्षाचा नाश करू शकतो. हे लोक काँग्रेसकडे ताकद नाही असं म्हणतात. जर ताकद नसेल तर कर्नाटकात भाजपचा पराभव कोणी केला? महाराष्ट्रात कोणता पक्ष मोडला नाही, तो आमचा पक्ष आहे. ही बब्बर शेरची पार्टी आहे, सिंहीणी पण आहेत. त्यांना घाबरत नाही. महाराष्ट्रात भाजपचा सफाया होणार आहे.

हेही वाचा:

  1. Rahul Gandhi Press Conference : अदानींच्या गुंतवणुकीत खरा पैसा कुणाचा? राहुल गांधींचा सवाल
  2. Rahul Gandhi PC: पंतप्रधान मोदी आणि उद्योगपती अदानी संदर्भात राहुल गांधी घेणार पत्रकार परिषद,
  3. Rahul Gandhi On Pandit Neharu : नेहरु मेमोरियल म्युझियमचे नाव बदलल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

ABOUT THE AUTHOR

...view details