मुंबई - गेल्या 13 दिवसांपासून बंद असलेला मुंबई-पुणे रेल्वे मार्ग पुन्हा एकदा वाहतुकीसाठी सुरू झाला आहे. पुणे आणि मुंबईतील नागरिकांसाठी रेल्वे मार्ग मोकळा झाला आहे. शुक्रवारपासून एकूण १२ रेल्वे गाड्या या मार्गावरून सोडण्यात येणार आहेत. तसेच काही गाड्या त्यांच्या नियमित मार्गावर धावतील, तर काही गाड्यांचे मार्ग कमी करण्यात आले आहे.
अखेर मुंबई-पुणे रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी सुरू; 'या' 12 रेल्वेगाड्या धावणार
मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर मंकी हिल घाटामध्ये दरड कोसळणे, रुळाखालील भराव वाहून जाणे, रुळांवर पाणी साचणे, असे प्रकार घडत होते. त्यामुळे पुढील अनर्थ टाळण्यासाठी मध्य रेल्वेने हा मार्ग 3 ऑगस्टपासून वाहतुकीसाठी बंद केला होता. मात्र, आता या मार्गावरून १२ रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत.
मुंबई-पुणे रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी सुरू; 'या' 12 रेल्वेगाड्या धावणार
मुंबई-पुणे मार्गावर मंकी हिल घाटामध्ये दरड कोसळणे, रुळाखालील भराव वाहून जाणे, रुळांवर पाणी साचणे, असे प्रकार घडत होते. त्यामुळे पुढील अनर्थ टाळण्यासाठी मध्य रेल्वेने हा मार्ग 3 ऑगस्टपासून वाहतुकीसाठी बंद केला होता. यामुळे मार्गावरील सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.
शुक्रवारपासून सुरू करण्यात आलेल्या गाड्या -
- 17032 – हैदराबाद-मुंबई
- 12701 – मुंबई-हैदराबाद (मुंबईहून मनमाड, औरंगाबाद, लातूर रोड, परळी, विकराबादमार्गे धावणार)
- 12702 – हैदराबाद-मुंबई
- 17415 – तिरूपती-कोल्हापूर
- 17416 – कोल्हापूर-तिरूपती
- 11052 – कोल्हापूर-सोलापूर
- 11303 – मंगळुरू-कोल्हापूर
- 11010 – पुणे-मुंबई (नियमित मार्गावर धावणार)
- 11009 – मुंबई-पुणे (नियमित मार्गावर धावणार)
- मुंबई-पुणे (नियमित मार्गावर धावणार)
- 12128 – पुणे-मुंबई (नियमित मार्गावर धावणार)
- 22106 – पुणे-मुंबई (नियमित मार्गावर धावणार)