महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'डोंगरी येथील अनधिकृत बांधकामांना स्थानिक लोकप्रतिनिधीही जबाबदार' - स्थायी समिती अध्यक्ष

या विभागातील अतिक्रमण निर्मूलन विभाग, लायसन्स विभाग यामधील अधिकारी जबाबदार आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, मात्र, त्याचवेळी अनधिकृत बांधकामांना स्थानिक लोप्रतिनिधीही जबाबदार असल्याचा आरोप स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला.

यशवंत जाधव

By

Published : Jul 19, 2019, 9:08 PM IST

मुंबई- डोंगरी येथील केसरबाई इमारत दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद महापालिका सभागृहात उमटले. यावेळी सर्व पक्षीय नगरसेवकांनी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, डोंगरी येथील अनधिकृत बांधकामांना स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजेच आमदार आणि नगरसेवकही जबाबदार असल्याचा गंभीर आरोप स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला आहे.

डोंगरी येथील अनधिकृत बांधकामांना स्थानिक लोकप्रतिनिधीही जबाबदार - स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव

मुंबईच्या डोंगरी येथील केसरबाई इमारत मंगळवारी कोसळली. या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला. या मृतांना पालिका सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सर्व पक्षीय नगरसेवकांनी दुर्घटनेला जबाबदार असलेल्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. विरोधी पक्षनेते रावी राजा यांनी पालिकेची आपत्कालीन व्यवस्थापन विभाग सक्षम करायला पाहिजे. अग्निशमन दलाकडून आधुनिक यंत्रणा व उपकरणांचा वापर केला गेला पाहिजे. दुर्घटनेत अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीचा जीव वाचला पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले.

पालिकेच्या बी, सी, डी आणि ई विभागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत. डोंगरी येथील केसरबाई इमारतीच्या तसेच या विभागातील अनधिकृत बांधकामांना अधिकारी दोषी आहेत. यासाठी या विभागातील अतिक्रमण निर्मूलन विभाग, लायसन्स विभाग यामधील अधिकारी जबाबदार आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, मात्र त्याचवेळी अनधिकृत बांधकामांना स्थानिक लोप्रतिनिधीही जबाबदार असल्याचा आरोप स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला. या विभागात काँग्रेसचे आमदार आणि आणि नगरसेवक निवडून येत असल्याचे जाधव म्हणाले यामुळे त्यांनाही दोषी ठरवून कारवाई करावी अशी मागणी जाधव यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details