मुंबई - राज्यात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याबरोबर घरातच देखरेखीखाली राहण्याचा सल्ला देण्यात आलेल्या लोकांचीही संख्या वाढत आहे. या रुग्णांच्या सहवासात आल्याने इतर नागरिकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता असल्याने अशा लोकांच्या हातावर शिक्का मारला जात आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी असे शिक्के हातावर मारले जाणार असल्याचे घोषित केले होते. त्याची अंमलबजावणी कस्तुरबा रुग्णालयात करण्यात आली.
'प्राउड टू प्रोटेक्ट मुंबईकर': घरी देखरेखीखाली असलेल्या कोरोनाग्रस्तांच्या हातावर शिक्के मारण्यास सुरुवात - corona virus mumbai
कस्तुरबा रुग्णालयात आजपासून कोरोनाग्रस्तांच्या हातावर शिक्का मारण्यास सुरुवात केली आहे. या शिक्क्यावर 'प्राउड टू प्रोटेक्ट मुंबईकर, होम कॉरंनटाईन' असे लिहिले आहे.
हेही वाचा -BREAKING : मंत्रालयातही कोरोनाचा संशयित रुग्ण
चीनमधील हुवान प्रांतामधून सुरू झालेला कोरोना विषाणू जगभरात पसरला आहे. हजारो लोकांचा बळी घेणारा हा विषाणू महाराष्ट्रातही पोहचला आहे. मुंबई आणि परिसरात कोरोनाची लागण झालेले 14 रुग्ण असून, महाराष्ट्रात 39 रुग्ण आहेत. या रुग्णांवर मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयासह राज्यातील इतर रुग्णालायत उपचार सुरू आहेत. रुग्णांबरोबर ज्यांना रुग्णालयात उपाचाराची गरज नाही ते आपल्या घरातही उपचार घेऊ शकतात अशा रुग्णांना 14 दिवस घरामध्ये देखरेखीखाली राहण्याच्या सूचना डॉक्टरांकडून दिल्या जात आहेत.
डॉक्टरांनी घरातच 14 दिवस राहण्याचा सल्ला दिला असला तरी हे लोक बाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे लोक बाहेर गेल्यास त्यांच्यामुळे इतर नागरिकांमध्ये विषाणू पसरण्याची भीती असल्याने अशांना सहज ओळखता यावे म्हणून, कस्तुरबा रुग्णालयात आजपासून त्यांच्या हातावर शिक्का मारण्यास सुरुवात केली आहे. या शिक्क्यावर 'प्राउड टू प्रोटेक्ट मुंबईकर, होम कॉरंनटाईन' असे लिहिले आहे. तसेच किती तारखेपर्यंत होम कॉरंनटाईन राहायचे आहे. त्याची तारीख आहे. या शिक्यामुळे असे लोक बाहेर फिरताना आढळल्यास सामन्यात नागरिक त्यांच्यापासून लांब राहून आपले संरक्षण करू शकतात.