मुंबई - आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरले असून मुंबईत 18 ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्य बाजू मांडून स्थगिती उठवावी आणि आरक्षणाचा निर्णय लागल्यावर पोलीस भरती करावी, अशी मागणी मराठा आंदोलकांकडून करण्यात आली आहे.
मुंबई : आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर; 18 ठिकाणी ठिय्या आंदोलन
मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाची योग्य बाजू मांडून स्थगिती उठवावी, या मागणीसाठी आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. मुंबईत 18 ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
मराठा क्रांती मोर्चा
मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांत मराठा आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत.
Last Updated : Sep 20, 2020, 3:46 PM IST