मुंबई -शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांनी कथित प्रेम संबंधातील महिलेवर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी ( Underworld Don Dawood Ibrahim ) संबंध असल्याचा आरोप केला होता. दाऊद इब्राहिम कुठे आहे, याबाबतची माहिती राहुल शेवाळे यांना माहीत असताना देखील त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणेला याबाबतची माहिती दिली नसल्याने त्यांच्या विरोधात MCOCA अंतर्गत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुंबई सत्र न्यायालयात ( Mumbai Session Court ) करण्यात आली होती. या याचिकेवर आज प्रिन्सिपल न्यायाधीश सुब्रम्हण्यम ( Mumbai Session Court Principal Judge ) त्यांच्यासमोर सुनावणी पार पडली. त्यावेळी या प्रकरणात राज्य सरकारला सरकारी वकील नियुक्त ( Appointment of public prosecutor ) करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या याचिकेवर पुढील सुनावणी 5 जानेवारी रोजी होणार आहे.
राहुल शेवाळे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यताप्रिंसिपल न्यायाधीश सुब्रम्हण्यम यांच्याकडे फौजदारी कारवाईसाठी करण्यात आलेल्या मागणीवर याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज सुनावणी होऊन राज्य सरकारला ह्या प्रकरणात लीगल एड मार्फत सरकारी वकिलांची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे राहुल शेवाळे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
महिलेचे दाऊद इब्राहिमशी संबंधखासदार राहुल शेवाळे ( Pradip Bhalekar Demand MCOCA On Mp Rahul Shewale ) यांचे एका महिलेसोबत कथित प्रेमसंबंध असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या महिलेने राहुल शेवाळे यांच्या विरोधात मुंबईतील साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीने नुकताच पार पडलेल्या अधिवेशनात करण्यात आली होती. त्यानंतर राहुल शेवाळे यांनी महिलेचे दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याची पत्रकार परिषदेत माहिती दिली होती. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची माहिती असलेल्या महिलेची माहिती राहुल शेवाळेंनी दिली नाही. म्हमाजेच दाऊद इब्राहिमची माहिती केंद्रीय तपास यंत्रणा देण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित याचिकाकर्त्यांनी केली. यासह त्यांनी राहुल शेवाळे यांची MCOCA अंतर्गत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे. ही याचिका प्रदीप भालेकर यांनी दाखल केली होती.
काय आहे प्रकरण खासदार राहुल शेवाळे यांच्या कथित प्रेमप्रकरणात नवा ट्विस्ट आला. शेवाळेंचे ज्या महिलेशी प्रेमसंबंध आहेत, ती वस्तुस्थिती लपवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. शेवाळे यांनी महिलेचे दाऊद ( Principal Judge Directs Appointment of public prosecutor ) सोबत असलेल्या संबंधाची माहिती पोलिसांना का दिली नाही? शेवाळे दुबईला किती वेळा गेले? कोणाला भेटले? या संदर्भातील माहितीही मागविण्यात आली आहे. या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी चौकशीसाठी मुंबई सत्र न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे लेखी तक्रार केली होती.