मुबंई - डॉ. बाबासाहेब आंबेकडर यांच्या १२८ व्या जयंतीनिम्मित चैत्यभूमी परिसरातील दुकाने कंदील, फेटा, तसबिरी आदी विविध वस्तूंनी सजले आहेत. बाबासाहेबांची जयंती संपूर्ण भारतात रविवारी मोठ्या आंनदात साजरी केली जाणार आहे.
आंबेडकर जयंतीनिमित्त चैत्यभूमी परिसरात सजली दुकाने; रविवारी साजरा होणार उत्सव - chaityabhumi
चैत्यभूमी परिसरात असलेल्या दुकानात विविध कंदील, फेटा, निळे, झेंडे, बिल्ले विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत
चैत्यभूमी परिसरात असलेल्या दुकानात विविध कंदील, फेटा, निळे, झेंडे, बिल्ले विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. या वस्तुंना मोठ्या प्रमाणात मागणीसुद्धा आहे. निवडणुकीचा कोणताही परिणाम विक्रीवर झालेला नाही. यावेळी चीनवरून काही वस्तू विक्रीसाठी आल्या आहेत, असे सुरेश निकाळजे आणि अर्जुन केदार या विक्रेत्यांनी सांगितले.
चैत्यभूमी परिसरातही जयंतीनिमित्त रंगरंगोटीचे काम जोरात सुरू असून मुंबईतील आंबेडकरी बालेकिल्ल्यात जयंतीच्या कार्यक्रमाची आखणी सुरू झाली आहे. प्रशासनाकडूनही जोरदार तयारी केली जात आहे. लोकसभा निवडणुकीचा मोसम सुरू असल्याने यंदाची जयंती वेगळी असणार, यात शंकाच नाही.