मुंबई-आज राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला अशी चर्चा सर्वत्र आहे. 'कडवट भूमिका घेणाऱ्या सत्तार यांना आता कळले असेल, की या सरकारमध्ये काय होणार आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिलेला आहे. या सरकारमध्ये प्रचंड असंतोष आहे. सत्तार यांचा राजीनामा हे या असंतोषाची सुरुवात आहे,' असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे.
सत्तार यांचा राजीनामा ही असंतोषाची सुरुवात - प्रवीण दरेकर
या सरकारमध्ये स्वार्थासाठी एकत्र आलेले पक्ष आहेत. सत्तार यांचा राजीनामा ही तर एक सुरुवात आहे. मात्र, या सरकारमध्ये प्रचंड असंतोष आहे. आजचा राजीनामा ह्या असंतोषाची ठिणगी आहे.
pravin-darekar-comment-on-abdul-sattar
हेही वाचा-'ती' कारवाई युद्ध थांबवण्यासाठी होती, सुरू करण्यासाठी नाही - ट्रम्प
या सरकारमध्ये स्वार्थासाठी एकत्र आलेले पक्ष आहेत. सत्तार यांचा राजीनामा ही तर एक सुरुवात आहे. मात्र, या सरकारमध्ये प्रचंड असंतोष आहे. आजचा राजीनामा ह्या असंतोषाची ठिणगी आहे. पुढील काळात असंतोषाचा आगडोम पेटणार आहे. अब्दुल सत्तार हे अत्यंत कडवटपणे पूर्वी बोलत होते. त्यांना आता कळतंय की खरे काय आहे. या सरकारमधील सर्वच पक्षांमध्ये असंतोष आहे.