मुंबई :मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयातील मृतदेह अदलाबदल प्रकरणी तज्ज्ञ डॉक्टर आणि पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी समिती नियुक्त करण्याची मागणी भाजपातर्फे पालिका आयुक्तांकडेकरण्यात आली आहे. पालिका आयुक्तांनीही समिती नेमण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच मृत अंकुश सुरवडे याच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याची मागणी भाजपाकडून करण्यात आल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली. सायन रुग्णालयातील मृतदेह अदलाबदल प्रकरणी प्रवीण दरेकर यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल आज (बुधवार) भेट घेतली. या भेटीनंतर दरेकर यांनी ही माहिती दिली आहे.
अंकुश सुरवडे (२६) या तरुणाचा मृतदेह पालिकेच्या सायन रुग्णालयात अदलाबदली झाला होता. या प्रकरणी रुग्णालयातील कर्मचाऱ्याना निलंबित करण्यात आले असून चौकशी केली जात आहे. या प्रकरणी भाजपने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत रुग्णालयाबाहेर आंदोलन केले आहे. दरेकर यांनी दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. त्यानंतर आज अंकुश सुरवडे याच्या कुटुंबीयांना सोबत घेऊन दरेकर यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी आमदार मंगलप्रभात लोढा, तामिळ सेलव्हन, पालिकेतील भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी अंकुशच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याची, मृतदेह अदलाबदली प्रकरणी चौकशी समिती नेमण्याची मागणी केली. सायन रुग्णालयातील शवविच्छेदन विभागात एकच डॉक्टर गेले 10 वर्ष एकाच पदावर कार्यरत आहे. अंकुशच्या डोक्याला मार लागला असताना त्याच्या कमरेजवळ ऑपरेशन केल्याचे दिसत आहेत. सायन रुग्णालयाचा पुनर्विकास गेले कित्येक वर्ष थांबला असल्याचे या भेटीदरम्यान पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. पालिका आयुक्तांनी त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती दरेकर यांनी दिली.
नेमके काय आहे प्रकरण -