मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरातच साजरी करावी व जयंतीनिमित्त जमा केलेला निधी हातावर पोट असणाऱ्या समूहाला देण्यात यावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
'फुले-आंबेडकर जयंतीचा निधी हातावर पोट असणाऱ्या समुहाला द्या' - बाबासाहेब आंबेडकर
महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जमा केलेला निधी सफाई कामगार, आरोग्य सेवक तसेच ह्या कोरोनाच्या काळात जी लोक आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत अशा हातावर पोट असणाऱ्या समुहाला द्यावा. त्यांचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले.
जयंतीनिमित्त जमा केलेला निधी सफाई कामगार, आरोग्य सेवक तसेच ह्या कोरोनाच्या काळात जी लोक आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत अशा हातावर पोट असणाऱ्या समुहाला द्यावा. त्यांचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. अशा लोकांची चूल विझणार नाही, याची काळजी घ्यावी. ह्या गरजू लोकांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू देण्यात याव्यात, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.
यंदाची जयंती आपण घरातूनच साजरी करावी. घरातील जयंतीचे फोटोज, व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून इतरांनीही ती घरातून साजरी करावी यासाठी आवाहन करावे, असेही आंबेडकर म्हणाले आहेत.