मुंबई : दहावीच्या परिक्षा झाल्या की, अकरावीचे वेध लागतात.मागील वर्षी हजारो विद्यार्थ्यांनी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी केली होती. परंतु अनेक विद्यार्थ्यांना आपले आवडीची शाखा मिळत नाह . तांत्रिक अडचणी येतात. शासनाकडून अनेक वेळा फेऱ्या जाहीर केल्या जातात. परंतु तरीही अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतात. मात्र या सर्व भूमीवर शासनाने काही तासापूर्वीच प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केलेले आहे. 20 मे पासून ज्याला मॉक डेमो नोंदणी म्हणता येईल, म्हणजे सराव नोंदणी विद्यार्थ्यांनी करायची आहे. 24 मे पर्यंत विद्यार्थ्यांना सराव नोंदणी करता येईल. पालकांनी विद्यार्थ्यांना मदत करावी म्हणजे अर्ज भरण्याची प्रक्रिया त्यांना समजेल, आणि ते व्यवस्थित अर्ज भरू शकतील.
11th Online Admission 2023: अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी 25 मेपासून होणार ऑनलाईन नोंदणी सुरू
शासनाने अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेबाबत सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार आता ज्या विद्यार्थ्यांना सराव करायचा आहे. त्याबाबत त्यांना 20 ते 24 मे या काळात करता येईल. 25 मे पासून प्रत्यक्ष सकाळी 11 वाजेपासून अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी करता येईल.
'असे' असेल वेळापत्रक आणि नियोजन :25 मे सकाळी 11 वाजेपासून तर महाराष्ट्र शासनाच्या दहावीचा निकाला येईपर्यंत ही ऑनलाईन नोंदणी सुरू राहील. यामध्ये विद्यार्थी स्वतः पालकांच्या मदतीने अर्ज भरू शकतात, त्याची खात्री त्यांनी करून घ्यावी. तसेच अर्जासंदर्भातील भाग पहिला अर्जाची खात्री करणे आहे. याबाबत माध्यमिक शाळा तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या अधिकृत केंद्रांनी सज्ज रहावे, असे शासनाच्या निर्णयात म्हटले आहे.
प्रवेशा संदर्भातील राखीव कोटा :अर्ज प्रक्रियेचा पहिला भाग झाल्यानंतर अर्ज प्रक्रियेचा भाग दोन देखील सुरू होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे, ते त्यांच्या पालकांच्या मदतीने अर्ज भरू शकतात. अंदाजे महाराष्ट्राच्या परीक्षा मंडळाचा निकाल आल्यानंतर हा दुसरा टप्पा सुरू होईल. ज्याला कॅप ऑप्शन फॉर्म असे म्हटले जाते. यंदा देखील शासनाच्या वतीने विद्यार्थी व संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयांसाठी राखीव कोटा देखील त्यात जाहीर केलेला आहे. अल्पसंख्यांक समूहातून 50 टक्के, इन हाऊस कोटा दहा टक्के तर व्यवस्थापनमधील कोटा पाच टक्के असणार आहे.
मदत केंद्र :नोंदणी प्रक्रिया झाल्यानंतर कॅपची नियमित फेरी होतील. पहिली फेरी 10 ते 15 दिवस होईल. त्यानंतर पुन्हा पुढच्या फेऱ्या एकेक आठवड्याच्या कालावधीमध्ये सुरू होतील. विशेष फेऱ्या देखील विद्यार्थ्यांसाठी केल्या जातील. यासंदर्भात शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी माध्यमिक उच्च माध्यमिक यांनी प्रतिक्रिया दिली की, विद्यार्थ्यांना यंदा अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश घेण्यासाठी मार्गदर्शन मिळावे म्हणून मदत केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी स्थापना करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याबद्दलचे पूर्ण नियोजन झालेले आहे. मागासवर्गीय किंवा विशेष प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत, त्यांना जो आरक्षणाचा कोटा लागू असेल त्या अंतर्गत त्यांना लाभ घेता यावा, म्हणून त्यांनी आधीच कागदपत्रे तयार ठेवावे.