मुंबई -लोकसभा निवडणुकीच्या निकालाला केवळ एक दिवसाचा अवधी उरला असून सर्वांचीच उत्सुकता ताणली गेली आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानंतर भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेल्या वेळच्या मताधिक्यपेक्षा अधिक मताधिक्य मिळवून जिंकणार असा विश्वास भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या वेळीपेक्षा अधिक मताधिक्याने गोपाळ शेट्टी जिंकणार? - winning
लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत राज्यातल्या सर्व जागांचा आढावा घेण्यात आला. भाजप कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत फळाला आली असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
गेल्या वेळपेक्षा अधिक मताधिक्याने गोपाळ शेट्टी जिंकणार?
लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोपाळ शेट्टी यांनी ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी सचिन गडहिरे यांच्याशी संवाद साधला. या बैठकीत राज्यातल्या सर्व जागांचा आढावा घेण्यात आला. जनतेने पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्यावरच विश्वास दाखवला असल्याचे एक्झिट पोल चे अंदाज सांगत आहेत. या शिवाय भाजप कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत फळाला आली असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.