मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेत भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे १० विद्यमान आमदार पक्षांतराच्या तयारीत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे. यामध्ये सोलापूर, अहमदनगर, सातारा, उस्मानाबाद, नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या आमदारांचा समावेश असल्याची माहिती मिळते आहे.
हे आमदार पक्षांतराच्या तयारीत
१) संग्राम जगताप
संग्राम जगताप ( अहमदनगर विधानसभा) २) राहुल जगताप
राहुल जगताप ( श्रीगोंदा विधानसभा ) 3) वैभव पिचड
वैभव पिचड (अकोले विधानसभा) ४) दिलीप सोपल
दिलीप सोपल (बार्शी विधानसभा) ५) बबनराव शिंदे
बबनराव शिंदे ( माढा विधानसभा) ६) संदिप नाईक
७) राणा जगजितसिंह पाटील
राणा जगजितसिंह पाटील (उस्मानाबाद) ८) शिवेंद्रराजे भोसले
शिवेंद्रराजे भोसले (सातारा) ९) अवधूत तटकरे
10) राजेश टोपे
राष्ट्रवादीतून बाहेर पडणाऱ्यांमध्ये या १० आमदारांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील ३ आमदारांचा समावेश आहे. यामध्ये आमदार वैभव पिचड, आमदार संग्राम जगताप, राहुल जगताप यांचा समावेश असून ते तीनही आमदार मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येते. यासोबत बार्शीतील आमदार दिलीप सोपल आणि माढ्यातील आमदार बबनराव शिंदे यांनीही शिवसेनेत जाण्याची तयारी केली आहे. तर दुसरीकडे नवी मुंबईतील आमदार संदीप नाईक, उस्मानाबाद येथील राणा जगजितसिंह आणि साताऱ्यातील शिवेंद्रराजे भोसले यांनीही भाजपमध्ये जाण्याचे निश्चित केल्याचे बोलले जात आहे.