महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 6, 2020, 5:03 PM IST

ETV Bharat / state

चित्रपट प्रदर्शनावर चित्रपट निर्माते आणि प्रदर्शकांमध्ये वाद; पूजा भट्टने केले 'हे' ट्विट

चित्रपट निर्माते आणि चित्रपट प्रदर्शनकर्ते यांच्यातील युद्ध हे म्हणजे दोन टक्कल माणसे कंगव्यासाठी लढत असल्यासारखे असून यात प्रेक्षक कुठे आहे? असा सवाल पूजा भट्ट यांनी ट्विटरवर केला आहे.

पूजा भट्ट, puja bhatt, puja bhatt tweet
puja bhatt

मुंबई- कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशात लॉकडाऊन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सिनेमागृहे बंद आहेत. त्यामुळे काही चित्रपट ओटीटी व्यासपीठावर प्रदर्शित होणार आहे. यामुळे चित्रपट निर्माते आणि चित्रपट प्रदर्शनकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. यावर अभिनेत्री आणि चित्रपट निर्मात्या पूजा भट्ट यांनी विचित्रपणे आपले मत व्यक्त केले आहे.

या काळात चित्रपट निर्माते आणि चित्रपट प्रदर्शनकर्ते यांच्यातील युद्ध हे म्हणजे दोन टक्कल माणसे कंगव्यासाठी लढत असल्यासारखे असून यात प्रेक्षक कुठे आहे? असा सवाल पूजा भट्ट यांनी ट्विटरवर केला आहे. पूजा यांचे ट्विट नेटिझन्सला हसवून सोडत आहे.

यावर ट्विटरवरील एका व्यक्तीने पूजा यांच्या ट्विटचे समर्थन केले आहे तर एका व्यक्तीने, काही प्रेक्षक घरी असून काही घरी जाण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत, हे चित्रपट निर्माते आणि प्रदर्शक या दोघांना माहीत असून हे का भांडत आहे, हे समजत नसल्याचे मत व्यक्त केले आहे.

अमिताभ बच्चन आणि आयुष्यमान खुराणा अभिनित चित्रपट गुलबो सिताबो या चित्रपटाला अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित करण्याचे चित्रपटाच्या निर्मात्यांनी ठरवले आहे. यावर मल्टिप्लेक्स आइनॉक्स यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर चित्रपट निर्माते आणि प्रदर्शक यांच्यात हा वाद सुरू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details