मुंबई - विधानसभा निवडणुकीच मैदान आता चांगलचं तापलं आहे. सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेत बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राज्यात भाजपची ताकद आणखी वाढली आहे. पुन्हा आम्हीच सत्तेत येऊ, असा दावा सत्ताधारी करत आहेत. तसेच यावेळी भाजपने जेष्ठ नेत्यांना डावलल्याने देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याची चर्चाही सुरु आहे. याचसंदर्भात ईटीव्ही भारतने राजकीय विश्लेषक जयदेव डोळे आणि कुमार सप्तर्षी यांच्याशी बातचीत केली आहे....
ज्या नेत्यांनी भाजप तळागाळात पोहोचवण्याचे काम केले. अशा नेत्यांना यावेळी भाजपने तिकीट नाकारले आहे. हे तिकीट नाकारण्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचेही बोलले जात आहे. एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांना तिकीट नाकारल्याने देवेंद्र फडणवीस यांचा मुक्यमंत्रीपदाचा मार्ग सुकर होत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत.
पंकजा मुंडेंसाठी नरेंद्र मोदींसह अमित शाहंची सभा
दुसरीकडे पंकजा मुंडे यांचेही पक्षातील वजन वाढताना दिसत आहे. त्यांच्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सभा घेतली आहे. तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा त्यांच्यासाठी प्रचारसभा घेणार आहेत. कालच (गुरुवारी) खासदार प्रीतम मुंडेंनी महिला मुख्यमंत्री पदासाठी पंकजा मुंडे यांच्याइतके दुसरे कोणी प्रभावी नसल्याचे म्हटले आहे. तसेच भविष्यात राज्याच्या राजकारणाची सूत्रे परळीतून हलवली जाणार असल्याचेही त्या म्हणाल्या होत्या. प्रीतम मुंडेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
विशिष्ट समाजघटकाकडेच नेतृत्व - जयदेव डोळे
भाजपने विशिष्ट समाजघटकाकडेच नेतृत्व दिले आहे. कमी संख्या असणाऱ्या समाजघटकाकडे नेतृत्व सोपवल्याने त्यांच्यावर अंकुश ठेवणे सोपे जाते. त्यामुळे त्यांनी ब्राम्हण समाजाचा मुख्यमंत्री नेमला असल्याचे मत राजकीय विश्लेषक जयदेव डोळे म्हणाले.
शाह आणि मोदींचा डाव