मुंबई: राज्याच्या राजकारणामध्ये राजकीय भूकंप घडवून आणण्यात शरद पवारांचा हातखंडा आहे. शरद पवारांनी आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून पाय उतार होत असल्याचे जाहीर करत, आणखी एकदा धक्का पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना दिला आहे. मात्र शरद पवारांचा हा निर्णय केवळ वैयक्तिक नव्हे तर, राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.
पवारांचा राजीनामा राजकीय स्फोट: यासंदर्भात बोलताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी म्हणाले की, शरद पवार यांच्या राजीनामा राष्ट्राध्यक्ष पद सोडण्याचा निर्णय ही महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अतिशय मोठी आणि अतिशय धक्कादायक स्फोटक अशी घटना आहे. मे च्या पहिल्या आठवड्यात मोठा स्फोट होईल असे जे अनेक नेते सांगत होते. त्यापैकी हा एक स्फोट आहे. असे आपल्याला म्हणायला हरकत नाही. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील अशा प्रकारचे भाकीत केले होते की, एक स्फोट दिल्लीत होईल आणि एक स्फोट मुंबई होईल. असे म्हटल्याचे जोशी यांनी सांगितले आहे.
अजित पवार व सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया नाही: शरद पवार यांनी वयोमानानुसार आणि प्रकृतीच्या इतर कारणांमुळे जर हा निर्णय घेतला असेल तर तो योग्य आहे, असे आपल्याला मानावे लागेल. एक मे 1960 पासून आपण राजकारणात आहोत. बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. असे त्यांनी म्हटले आहे, त्याचबरोबर सामाजिक कामातून आपण बाहेर पडणार नाही. आपल्या विविध संस्थांची काम आपण याच ताकतीने करत राहू विविध समाज घटकांना न्याय देण्याचा काम करत राहू असेही शरद पवार यांनी सांगितले आहे. परंतु साहजिकच राष्ट्रवादीमध्ये फार मोठ्या प्रमाणात खळबळ माजलेली आहे. नेते हे पवार साहेबांनी राजीनामा देऊ नये. सुप्रिया सुळे आणि त्यांचे बंधू अजित पवार या दोघांनीही प्रत्यक्षात कोणतीच प्रतिक्रिया माध्यमांना दिलेली नाही, याकडे अनिकेत जोशी यांनी लक्ष वेधले. अन्य नेत्यांनी मात्र शरद पवार यांना आम्ही सोडणार नाही त्यांनी अशा प्रकारे राजीनामा देऊ नये, त्यांची मनधरणी करू आणि कार्यकर्त्यांच म्हणण त्यांना ऐकावे लागेल अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली आहे.