मुंबई - मुंबई पोलिसांकडून डान्स बार बरोबरच वेश्या वस्तीतसुद्धा धडक कारवाई करण्यात आली आहे. मुंबईतील ताडदेव परिसरात ग्रीक पार्क या डान्स बारवर शनिवारी पहाटे छापेमारी करण्यात आली. मुंबईतील कामठीपुरा परिसरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला व दलालांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कामाठीपुऱ्यात पोलिसांचा छापा, १०० वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची सुटका - serious
पोलिसांची ही छापेमारी सुरू असताना पोलिसांपासून बचावासाठी एका महिलेने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी टाकली. ज्यात ती गंभीर जखमी झाल्याने नायर रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी त्यांच्या पथकासह २४ मे रोजी रात्री उशिरा कामठीपुरा परिसरात छापा मारून जवळपास १०० हून अधिक वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना सोडविले. या बरोबरच या महिलांवर वेश्या व्यवसाय करण्यास भाग पडणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली. ६ लाख रुपये सुद्धा जप्त करण्यात आले. पोलिसांची ही छापेमारी सुरू असताना पोलिसांपासून बचावासाठी एका महिलेने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी टाकली. ज्यात ती गंभीर जखमी झाल्याने नायर रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.