मुंबई:वकील पृथ्वीराज चव्हाण यांना पोलीस अधिकारी गीते यांच्या संदर्भात तक्रार दाखल करायची होती. तसेच ते दाखल करायला गेले असताना पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा वकील पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप आहे. वकील संबंधित पोलीस ठाण्यात गेले असता त्यांना सहाय्यक पोलीस अधिकारी अनंत गीते यांनी धक्काबुक्की केली, असे बार असोसिएशनचे पदाधिकारी राजेश मोरे यांनी सांगितले.
वकिलांची नाराजी:या घटनेनंतर मुंबई मधील बोरिवली तसेच अंधेरी येथील वकील मंडळी नाराज झाली. त्यांना आपल्या सहकारी व्यक्तीवर हल्ला झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी त्वरित काम बंद केले. त्यांचे म्हणणे होते की, वकिलावर असा हल्ला उचित नाही. परिणामी काम बंद आंदोलन करीत आहोत. काल 16 मार्च रोजी त्यांनी काम बंद केले होते, अशी देखील माहिती पदाधिकारी राजेश मोरे यांनी दिली.
माहितीवरून वाद: राजेश मोरे यांनी तपशील आणि सांगितले की, वकील पृथ्वीराज चव्हाण महत्त्वाच्या कायदेशीर कामासाठी पोलीस ठाण्यात गेले होते. पोलीस ठाण्यामध्ये जाऊन ते अशी माहिती देत होते, की ती माहिती पोलीस ठाण्यात जाऊन त्यांना पडताळायची होती. जेणेकरून त्यांच्या अशिलाची याचिका आणि त्यांची बाजू मांडताना सत्य माहिती याचिकेमध्ये येऊ शकेल; या कारणासाठी ते संबंधित पोलीस ठाण्यामध्ये सहाय्यक पोलीस अधिकारी अनंत गीते यांच्यासोबत बोलताना दोघांत वाद झाला.
पोलीस म्हणाले, वाद झाला हल्ला नाही: वकील न्यायालयीन कामकाज बाबतीत पोलीस ठाण्यात जातात तेव्हा पोलिसांनी समजून घेतले पाहिजे. बार असोसिएशनचे राजेश मोरे यांनी नमूद केले की, ह्या बाबत संबंधित बोरिवलीच्या पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, वकील सध्या वेशात होते. मात्र हल्ला झाल्याचे त्यांनी नाकारले. ह्या बाबत तपास सुरू आहे. या घटनेची पोलीस, वकील वर्गासह नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे.
हेही वाचा:Amruta Fadnavis Blackmail Case : अमृता फडणवीस फसवणूक प्रकरण; अनिक्षा जयसिंगानीला 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी