महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मानखुर्दच्या झोपडपट्टी विभागात पोलिसांचे पथसंचलन - मानखुर्द झोपडपट्टी

कोविड-19 चे रुग्ण मुंबई शहर आणि उपनगरात झपाट्याने वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. रुग्णाची संख्या पाहता लॉकडाऊन वाढवून 30 एप्रिलपर्यंत करण्यात आला आहे. या दरम्यान पोलीस शहरात अनावश्यक फिरणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करत आहेत. शनिवारी मानखुर्द परिसरात पोलिसांनी पथसंचलन करून नागरिकांना स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले.

Police March
पोलिसांचे पथसंचलन

By

Published : Apr 12, 2020, 8:34 AM IST

मुंबई - देशभरात कोरोना विषाणूचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. मुंबईत हजाराचा आकडा पार झाला असून वाढणारी रुग्णाची संख्या पाहता लॉकडाऊन वाढवून 30 एप्रिलपर्यंत करण्यात आला आहे. या दरम्यान पोलीस शहरात अनावश्यक फिरणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करत आहेत. शनिवारी मानखुर्द परिसरात पोलिसांनी पथसंचलन करून नागरिकांना स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले.

कोविड-19 चे रुग्ण मुंबई शहर आणि उपनगरात झपाट्याने वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. राज्य सरकार आणि पालिका प्रशासन विविध प्रकारच्या उपाययोजना राबवून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. रुग्ण आढळलेला परिसर सील करून निर्जंतुक करण्यावर भर देण्यात येत आहे. यापुढे लॉकडाऊनमध्ये फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. त्यामुळे पोलीस दल आणखी सतर्क झाले आहे.

उपनगरातील झोपडपट्टी विभागात जास्त लोकसंख्या असल्याने संचारबंदी काळात अनेक लोक रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे शनिवारी मानखुर्द येथे पोलिसांनी लल्लू भाई कंपाऊंड, साठे नगर, पीएमजीपी कॉलनी या मार्गावर पथसंचलन केले.

ABOUT THE AUTHOR

...view details