मुंबई- रिक्षा भाड्यातील पाच रुपये द्या, अशी मागणी केल्यामुळे पाच जणांनी एका 68 वर्षीय रिक्षा चालकाची हत्या केली आहे. ही घटना बोरिवली येथे घडली आहे.
बोरिवलीत केवळ 5 रुपयांसाठी रिक्षा चालकाची हत्या, पाज जण ताब्यात - मुंबई पोलीस
रिक्षा चालकाने पाच रुपये मागितले म्हणून त्याची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल असून पाच जणांनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्रतिकात्मक छायाचित्र
या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. रिक्षा चालकाने भाड्यातील उर्वरीत 5 रुपये त्या पाच जणांना मागितले होते. त्यावेळी त्यांनी रिक्षा चालकाला मारण्यास सुरुवात केली. यात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा -ठरलं..! मराठी भाषा दिनी विधानसभेत 'हा' कायदा होणार मंजूर