मुंबईPolice Found With Drugs:आर्थर रोड कारागृहात घडलेल्या या घटनेमुळे आर्थर रोड तुरुंगातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ६ ऑक्टोबरला सायंकाळच्या शिफ्टला पोलीस शिपाई विवेक नाईक याला आर्थर रोड कारागृहातील सुरक्षेच्या कर्तव्यावर तैनात करण्यात आले होते. मात्र ड्युटीवर हजर होताना त्याची अंगझडती घेतली तेव्हा त्याच्याकडे 71 ग्राम चरस आढळून आले.
आरोपीला 9 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी:याप्रकरणी 6 ऑक्टोबरला ना म जोशी पोलीस ठाण्यात आर्थर रोड कारागृह प्रशासनाने केलेल्या तक्रारीवरून एन डी पी एस कलम 8(C),20(B)2(A) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 7 ऑक्टोबरला सकाळी आरोपी असलेल्या पोलीस शिपाई विवेक नाईक याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आर्थर रोड म्हणजेच मुंबईतील मध्यवर्ती कारागृह असलेल्या ठिकाणी तैनात असलेल्या पोलीस शिपाई विवेक नाईक याला तात्काळ ना म जोशी पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला अटक केली आणि न्यायालयात हजर केले होते. रिमांडसाठी न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला न्यायालयाने 9 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कारागृहाबाहेरील रस्त्यावर आढळली ड्रगची पिशवी:काही महिन्यांपूर्वीच आर्थर रोड कारागृहाबाहेर आर्थर रोड कारागृहामधून अंमली पदार्थ असलेली प्लास्टिक पिशवी फेकण्यात आली होती. ही ड्रग्जची पिशवी आर्थर रोड कारागृहातून रस्त्यावर बाहेर फेकण्यात आली होती. ही पिशवी कोणी फेकली याविषयी अद्याप पोलिसांना काहीही माहिती प्राप्त झालेली नाही. याप्रकरणी ना म जोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आर्थर रोड कारागृहात तैनात असलेल्या पोलीस शिपायाकडे सापडलेल्या 71 ग्राम चरसमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या शिपायाने हे कोणत्या कैद्याला देण्यासाठी ड्रग्स आणले होते का? याचा तपास ना म जोशी पोलीस करत आहेत. त्याचप्रमाणे या पोलीस शिपायाने कुठून हे ड्रग्स विकत घेतले होते याचा देखील माग पोलीस लावणार आहेत.
हे तर सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्हच:तुरुंगात अचानक केलेल्या पाहणीत अनेक कैद्यांकडे ड्रग्ज, मोबाईल फोन आणि इतर ऐशोआरामाची साहित्ये आढळून येतात. यावर वरवर कारवाई केली जाते. मात्र, कैद्यांकडे हे साहित्य सातत्याने सापडणे हे तुरुंगाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे.
हेही वाचा:
- Satara Double Murder : दुहेरी हत्याकांडानं सातारा हादरलं! शेतात पाणी द्यायला गेलेल्या दाम्पत्याची निर्घृण हत्या
- Fire In Firecracker : आगीत मृत्यूमुखी पडलेल्या 14 जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखांची मदत
- ShahRukh Khan Fans Riot : मालेगावला शाहरुख खानच्या चाहत्यांची हुल्लडबाजी, चित्रपटगृहात फोडले फटाके...