मुंबई -सेकंदाप्रमाणे चालणाऱ्या मुंबईकरांची भूक भागवणाऱ्या मुबंईच्या डबेवाल्यांना शाळेत डबा पोहचवण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही बंदी असल्याचे सांगितले जात आहे. या बंदी विरोधात डबेवाला संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, यावर स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष देत या संदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांनी शिक्षण उपसंचालकांसोबत तातडीने संयुक्त बैठक घ्यावी, असे निर्देश दिले आहेत.
डबेवाल्यांना शाळेमध्ये डबाबंदी; डबेवाला संघटनेची नाराजी - mumbai
छोटे कुटुंब, आई-वडील दोघे कामाला, अशावेळी मुलांना डबा देण्यासाठी कोणी नसते, अशा परिस्थितीत मुलांना घरगुती जेवण मिळावे यासाठी डबा लावण्यात येतो. हा डबा पोहचवण्याचे काम देण्यात येते. पण सुरक्षेच्या कारणास्तव या डबेवाल्यांना शाळेत डबा पोहचण्यास मुंबई पोलिसांकडून मनाई करण्यात आली आहे. या बंदी विरोधात डबेवाला संघटनेंनी मुख्यमंत्र्याकडे मदत मागितली आहे.
छोटे कुटुंब, आई-वडील दोघे कामाला, अशावेळी मुलांना डबा देण्यासाठी कोणी नसते, अशा परिस्थितीत मुलांना घरगुती जेवण मिळावे यासाठी डबा लावण्यात येतो. हा डबा पोहचवण्याचे काम देण्यात येते. पण सुरक्षेच्या कारणास्तव या डबेवाल्यांना शाळेत डबा पोहचण्यास मुंबई पोलिसांकडून मनाई करण्यात आली आहे. या बंदी विरोधात डबेवाला संघटनेंनी मुख्यमंत्र्याकडे मदत मागितली आहे. यावर मुंबई पोलीस आयुक्तांनी तातडीने शाळा, डबेवाले यांची संयुक्त बैठक घेऊन यावर तोडगा काढावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनीही शिक्षण उपसंचालकांनी याबाबत तातडीने लक्ष घालावे. तसेच ही सेवा सुरू राहिल याकडे लक्ष द्यावे, असे निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांना आरोग्यदायी अन्नपदार्थ खाण्यापासून वंचित ठेवले जात आहे. विद्यार्थ्यांना डबे पुरवण्यास शाळांनी मनाई केली आहे, असा आरोप मुंबई डबेवाले संघटनेचे नेते सुभाष तळेकर यांनी केला आहे.