महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महिलांचे अश्लील फोटो फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्यास अटक - baramati police news

शेकडो महिलांचे अश्लील फोटो बनवून ते फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस बारामती पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

police arrested man who viral photos of women on Facebook in baramati
महिलांचे अश्लील फोटो फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्यास अटक

By

Published : Jul 6, 2020, 4:57 PM IST

बारामती (पुणे) - शेकडो महिलांचे अश्लील फोटो बनवून ते फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस बारामती पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी गणेश खरात या बनावट नावाने फेसबुकवरती शेकडो महिलांशी मैत्री करून त्यांच्या प्रोफाइलवरील फोटो एडिट करून अश्लील फोटो बनवत होता. माझ्याशी मैत्री कर, माझ्याशी बोल नाहीतर तुझे अश्लील फोटो मी व्हायरल करीन अशी धमकी तो द्यायचा. त्यामुळे राज्यभरातील शेकडो महिला भयभीत झाल्या होत्या. एका महिलेने धाडस करून सदर घटनेप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून बारामती तालुका ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे स पो नि योगेश लंगुटे, पो. ना. परिमल मानेर, पोलीस कॉन्स्टेबल नंदू जाधव, मंगेश कांबळे यांनी तांत्रिक बाबीच्या साह्याने संदीप सुखदेव हजारे (वय 29.रा आंबवडे, ता. खटाव,जि. सातारा) यास दहिवडी येथून अटक केली आहे.

अधिक तपास केला असता, आरोपीवर समर्थ पोलीस स्टेशन पुणे, घारगाव पोलीस स्टेशन जि. अहमदनगर, कराड पोलीस स्टेशन जि. सातारा, संगमनेर पोलीस स्टेशन जि. रत्नागिरी या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून महाराष्ट्रात सदर आरोपी विरोधात आणखी गुन्हे दाखल असण्याची शक्यता आहे. सदर आरोपीने शेकडो महिलांना धमक्या दिल्याचे निष्पन्न झाले असून, महिलांनी न घाबरता पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आव्हान बारामती पोलिसांकडून करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details