मुंबई - पत्नीसोबत किरकोळ वादानंतर पतीने पत्नीचा खून करत हाताची नस कापत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पतीचा हा आत्महत्येचा प्रयत्न अयशस्वी झाला. या प्रकरणी पतीला वडाळा टी. टी. पोलिसांनी अटक केली आहे.
वडाळ्यात पत्नीचा खून करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पतीस अटक - husband-wife
महिलेचे शवविच्छेदन करण्यात आले त्यात महिलेला अमानुष मारहाण करून खून करण्यात आला, असा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला.
या घटनेतील आरोपी पती संजयकुमार भटेल पडीहरी (वय २९, रा. सायन प्रतिक्षानगर) याच्या घरातून २१ मे रोजी दुर्गंधी येत असल्याने शेजारी राहणारे मनोज भरत मर्डेकर यांनी घरात डोकावून पाहिले तर घरात एक महिला व पुरुष रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचे दिसले. याबाबत त्यांनी सायन पोलिसांना याची माहिती दिली. तत्काळ या ठिकाणी पोलीस दाखल झाले व त्यांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी त्यांना घरात एक महिला अर्धवट जळलेल्या व सडलेल्या अवस्थेत आढळून आली. सोबत घरातच एक पुरुष जखमी अवस्थेत आढळून आला.
पोलिसानी तत्काळ दोघांनाही सायन रुग्णालयात दाखल केले तेव्हा वैदकीय अधिकाऱ्यांनी महिलेला मृत घोषित केले. महिलेचे शवविच्छेदन करण्यात आले त्यात महिलेला अमानुष मारहाण करून खून करण्यात आला, असा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. यावेळी पोलिसांनी जखमी पती संजयकुमार पडीहरी यास चौकशी केली तेव्हा आरोपीने गुन्हा कबूल केला व पत्नीचा खून मी केला व आत्महत्येचा प्रयत्न केला असे सांगितले.