मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी अचानकपणे ईडी कार्यालयाच्या समोर येऊन निदर्शने केली. त्यामुळे आम्ही त्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करत आहोत. 4 ते 5 लोकांना आम्ही ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर माता रमाई पोलीस ठाण्यामध्ये पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती डीसीपी संग्रामसिंह निशाणदार यांनी दिली आहे.
'राष्ट्रवादी युवक काँग्रेसने 'ईडी' कार्यालयाबाहेर आंदोलन केल्यामुळे कारवाई' - शरद पवारांवर गुन्हा दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी याचा निषेध म्हणून बॅलार्ड पिअर परिसरातील ईडीच्या कार्यालयासमोर निदर्शन करत सरकार आणि या कारवाईचा निषेध केला.
डीसीपी संग्रामसिंह निशानदार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी याचा निषेध म्हणून बॅलार्ड पिअर परिसरातील ईडीच्या कार्यालयासमोर निदर्शन करत सरकार आणि या कारवाईचा निषेध केला. त्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार करत त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.