मुंबईPramod Mahajan Skill Development Centers : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (19 ऑक्टोबर) राज्यातील प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन होणार आहे. या कौशल्य विकास केंद्रांचं उद्घाटन सायंकाळी चार वाजता राज्यातील ५११ ग्रामपंचायतींमधून ऑनलाइन पद्धतीनं करण्यात येणार आहे.
१०० तरुणांना किमान दोन व्यावसायिक अभ्यासक्रमांचं प्रशिक्षण :ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं या ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांमध्ये विविध क्षेत्रांचे प्रशिक्षण दिलं जाणार आहे. प्रत्येक केंद्रामध्ये सुमारे १०० तरुणांना किमान दोन व्यावसायिक अभ्यासक्रमांचं प्रशिक्षण दिलं जाईल. हे प्रशिक्षण पॅनलवर असलेल्या औद्योगिक भागीदारांद्वारे आणि राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळाच्या वेगवेगळ्या संस्थांमार्फत देण्यात येईल. तसंच या केंद्रांच्या स्थापनेमुळं या क्षेत्रात अधिक सक्षम आणि कुशल मनुष्यबळ विकसित करण्यासाठी लक्षणीय प्रगती साधण्यात मदत होईल, असं राज्य सरकारनं म्हंटलंय.
भविष्यात केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार :रोजगारासाठी तरुणांचे गावातून शहरात स्थलांतर होऊ नये, या हेतूनं कौशल्य विकास केंद्रांची संकल्पना महत्वाची आहे. भविष्यात राज्यातील या केंद्रांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. तसंच या कार्यक्रमात कौशल्य विकास, उद्योग, महसूल, ग्रामविकास यांच्यासह महिला व बालविकास विभागांचा सहभाग असणार आहे. लोकप्रतिनिधींसह आशा आणि अंगणवाडी सेविका देखील या कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटनात सहभागी होणार आहेत.
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री ऑनलाइन पद्धतीनं राहणार उपस्थित : या कार्यक्रमासाठी आज सह्याद्री अतिथीगृह येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा -
- Narendra Modi : आम्ही ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यासाठी इच्छुक, २०३६ ऑलिम्पिकसाठी दावा ठोकणार - पंतप्रधान मोदी
- Maadi Song Out : नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलं 'हे' गाणं; पाहा व्हिडिओ...
- PM Narendra Modi Mumbai Visit : आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या सत्राचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन