पश्चिम रेल्वेवर प्रवाशांचे हाल सुरूच मुंबई : खार आणि गोरेगाव स्थानकादरम्यान मुंबई उपनगरीय विभागादरम्यानच्या सहाव्या मार्गाचे काम जलदगतीने पूर्ण करण्याच्या मोहिमेवर पश्चिम रेल्वे सुरू आहे. त्यामुळे रोज शेकडो लोकल सेवा रद्द केल्या जात आहे. आज 233 लोकल सेवा रद्द करण्यात (233 local Trains Are Cancelled) आल्या आहेत. परिणामी प्रवाश्यांच्या गैरसोयीचे सत्र सुरूच आहे.
233 लोकल रद्द लोकल 10 मिनिटे उशिराने: पश्चिम रेल्वेच्या गोरेगाव येथील सहाव्या मार्गिकेसाठी 26 ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लोकल रद्द होतील, असं रेल्वे प्रशासनाने अवघ्या चार दिवसापूर्वीच घोषित केलं होतं. परंतु याचं नियोजन एक महिन्याआधी लोकांना कळवायला हव होतं. अशी लोकांची संतप्त भावना झालेली आहे. 30 ऑक्टोबर रोजी 300 पेक्षा अधिक लोकल सेवा पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावर रद्द झाल्या. त्याचा परिणाम लोकल 20 मिनिटे उशिरा धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावं लागत आहे. आज देखील लोकल रद्द झाल्याने लोकल सेवा 10 ते 15 मिनीटं उशिराने धावत आहेत.
30 ऑक्टोबर रोजी प्रवाश्यांचा संतापाचा कडेलोट: 30 ऑक्टोबर रोजी प्रवाश्यांचा संतापाचा कडेलोट झाला. शेकडो लोकल सेवा रद्द केल्या गेल्या. परिणामी पश्चिम उपनगरीय रेल्वे सेवा कोलमडली. 20 मिनिटे रेल्वे उशिरा धावत होती. कामावर जाणाऱ्या प्रवाश्याना त्याचा फटका बसला. तर रेल्वे प्रवाशांनी सोशल मीडियात संताप व्यक्त केला.
...तर प्रचंड गर्दी कमी झाली असती :जेव्हा कोणत्याही रेल्वे सेवेबाबत रेल्वे प्रशासन अशा प्रकारचा निर्णय घेतं नियोजन करते, तेव्हा प्रचंड गर्दी रेल्वे स्थानकांवर होते. याचा अनुभव रेल्वे प्रशासनास आहे. अशा वेळेला इतर सरकारी वाहतूक व्यवस्था यांच्यासोबत रेल्वे प्रशासनाने संपर्क केला असता, तर प्रचंड गर्दी कमी झाली असती. प्रवाशांना इतका त्रास झाला नसता असं अनेक प्रवाशांचं म्हणणं आहे.
इतर यंत्रणासोबत कोणताही समन्वयाचा अभाव : अनेक वर्षापासून प्रमोद शिंदे बोरिवली ते चर्चगेट रोज प्रवास करतात. त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली की, रेल्वे प्रशासनाने मुंबई महानगरपालिका बेस्ट एसटी महामंडळ अशा शासकीय यंत्रणांसोबत समन्वय करायला हवा होता. म्हणजे विरार, डहाणू बोरवली, कंदिवली येथील प्रवासी ठाण्यापर्यंत रस्ते मार्गाने आले असते. ठाण्याला मध्यरेल्वे पकडून दादर किंवा छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत प्रवास केला असता. परंतु पश्चिम रेल्वे प्रशासनाने मध्यरेल्वे सोबत देखील कोणताही समन्वय केल्याचे दिसत नाही.
रेल्वे प्रशासनाची भूमिका: पश्चिम रेल्वे प्रशासनाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी खुलासा केला की, 316 लोकल फेऱ्या 31 ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आल्या होत्या. परंतु आता 83 लोकल सेवा पुन्हा चालवल्या जातील. म्हणजे 233 लोकल सेवा फक्त रद्द केल्या गेल्या आहेत. प्रवाशांना कमीत कमी त्रास कसा होईल याकडं आमचं लक्ष असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा -
- Western Railway : पश्चिम रेल्वे स्थानकांवर जीपीएस डिव्हाईस इंस्टॉल काम सुरू ; प्रवाशांना मिळणार यात्री ॲप फायदा
- Western Railway Line : पश्चिम रेल्वे मार्गावर दुरुस्ती कामामुळे 200 पेक्षा जास्त लोकल रद्द; रेल्वे प्रवासी संघटनेनं व्यक्त केला संताप
- VIDEO : मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेन सेवा विस्कळीत