मुंबई - पूर्व उपनगरातील चेंबूर विभागात वाशी नाका परिसरात पाईपलाईनचा व्हॉल्व बदलतेवेळी रस्त्यावर पाणीच-पाणी झाले. यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. पिण्याचे पाणी पुरवठा करणारी ही पाईपलाईन पालिकेची आहे.
महापालिकेचा भोंगळ कारभार ! चेंबूर-वाशी नाका परिसरात पाईपलाईनचा व्हॉल्व बदलताना लाखो लिटर पाणी वाया
चेंबूर विभागात वाशी नाका परिसरात पाईपलाईनचा व्हॉल्व बदलतेवेळी रस्त्यावर लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.
लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.
रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे रस्ते वाहतूकीचा वेग काही वेळ मंदावला होता. नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. पालिकेच्या जल विभागाकडून पाईपलाईनचा व्हॉल्व बदलण्यात आला त्यामुळे ते पाणी सोडले होते, असे स्पष्टीकरण पालिकेकडून देण्यात आले आहे.