मुंबई- भारतीय वैमानिक अमोल यादव यांनी भारतीय बनावटीचे विमान तयार केले. या विमानाच्या उड्डाणाला हवाई संचालनालयाने परवानगी नाकारली आहे. यामुळे यादव आपल्या विमानाची नोंदणी अमेरिकेत करण्याच्या तयारीत आहेत.
'मेक इन इंडिया'चा फज्जा !!! भारतीय बनावटीच्या विमान उड्डाणाची परवानगी नाकारली
भारतीय बनावटीच्या विमान उड्डाणाची परवानगी नाकारली
भारतीय वैमानिक अमोल यादव यांनी ६ वर्षे अथक परिश्रम घेऊन भारतीय बनावटीचे विमान तयार केले. त्यांना सध्या या विमानाच्या उड्डाणाची परवानगी हवी आहे. यासाठी त्यांनी डीजीसीए अर्थात हवाई संचालनालयाकडे परवानगी मागितली आहे. मात्र, यादव यांच्या या मागणीला हवाई संचालनालयाने हिरवा कंदिल दिलेला नाही. त्यामुळे यादव यांनी या विमानाची नोंदणी अमेरिकेत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
एकीकडे मेक इन इंडिया चा गवगवा केला जात आहे. तर दुसरीकडे मेड इन इंडिया विमानाला हवाई संचालनालय परवानगी नाकारत आहे.