मुंबई :मुंबईतील कबुरतखाण्यांमुळे माणसांना विविध श्वसानाचे विकार जडतात. पंख आणि विष्ठेमुळे ऑक्सिजनची पातळी ही घटत असल्याचे धक्कादायक माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. कोणतेही कबुरतखाणे हेरिटेज नाहीत. उलट, सार्वजनिक ठिकाणी पक्षांना खाद्यपदार्थ खायला घातल्यास मुंबई मनपाकडून पाचशे रुपयाचा दंड आकारण्यात येतो, असेही मंत्री सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.
विधान परिषदेत मुद्दा उपस्थित :भाजपच्या सदस्या उमा खापरे यांनी मुंबईतील विना परवाना कबुरतखान्यांबाबतची लक्षवेधी विधान परिषदेत उपस्थित मांडली. देशभरातून पर्यटक मुंबईतील कबुतरखाण्यांना भेटी देतात. हेरिटेजचा दर्जा कबूतरखाण्यांना दिला असताना, मनपाकडे त्यांची नोंद नाही. कबुतरांना खाद्य पदार्थ टाकल्यास कारवाईचा बडगा उगारला जातो. कबुतरखान्यांना अधिकृत परवाना द्यावा. श्वसनाचे विकारबाबत राज्य शासन आणि मुंबई मनपाने मोहीम राबवावी, अशी मागणी खापरे केली. मंत्री उदय सामंत यांनी लक्षवेधीवर उत्तर देताना, कबुतरखाण्यांमुळे जडणाऱ्या व्याधींकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
सर्वेक्षणातून महत्वाची माहिती समोर : मुंबईत दादर, एम.एस. अली रोड जंक्शन, गिरगांव चौपाटी, ऑगस्ट क्रांती मैदान, मलबार हिल, नवजीवन सोसायटी, एन.एस.रोड पेट्रोल पंप, जी.पी.ओ. आणि गेट वे ऑफ इंडिया या प्रमुख ठिकाणी कबुतरखाने आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून येथे कबुतरांना खाण्यासाठी दाणे टाकले जातात. कबुतरांची विष्ठा, पंख आणि पिसांमुळे फंगल स्पोर्स हा विकार होत आहे, अशी बाब के.ई.एम. रुग्णालयातील श्वसनविकार चिकित्सा व पर्यावरण प्रदूषण संशोधन केंद्राने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.
कबुतरांमुळे होतात आजार :एवढेच नव्हे तर एक्सट्रेंसिक अॅलर्जिक अॅलव्होलिटीस हा आजार देखील कबुतरांमुळे होतो आहे. खोकला, दम लागण्याबरोबरोच ऑक्सिजनची पातळीत घट होत असल्याची धक्कादायक बाब मंत्री सामंत यांनी निर्देशनास आणून दिली. मुंबईत सार्वजिनक ठिकाणी घाण केल्यास मनपाकडून कारवाई केली जाते. तसेच पक्षी किंवा प्राण्यांना खायला घातल्यास, सार्वजनिक ठिकाणी उपद्रव केल्यास प्रति घटनेनुसार 500 रूपयांचा दंड आकारला जातो. गेल्या तीन महिन्यांत पक्ष्यांना खायला घालून उपद्रव केल्याप्रकरणी केलेल्या कारवाईत सुमारे 10 हजार रुपयांचा दंड आकारल्याची माहिती, मंत्री सामंत यांनी दिली.
हेही वाचा : Ajit Pawar on Shinde Govt : कुरघोडीचे राजकारण करू नका; जनतेच्या प्रश्नांना न्याय द्या, अजित पवारांचे सरकारवर टीकास्त्र