महाराष्ट्र

maharashtra

Picture Of Jesus Christ In House : घरात येशू ख्रिस्ताचा फोटो लावला म्हणजे त्याचा अर्थ ख्रिश्चन धर्म स्वीकारणं नव्हे - मुंबई उच्च न्यायालय

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 20, 2023, 6:31 PM IST

Picture Of Jesus Christ In House : जिल्हा जात पडताळणी समितीनं एका अनुसूचित जातीच्या मुलीला इतर मागासवर्गीय जातीचं प्रमाणपत्र दिलं होतं. याविरुद्ध या अल्पवयीन मुलीनं न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयानं हा निर्णय दिला.

Bombay High Court
Bombay High Court

मुंबई :Picture Of Jesus Christ In House : घरात येशू ख्रिस्ताचा फोटो लावला म्हणजे त्या घरातील व्यक्तींनी ख्रिश्‍चन धर्म स्वीकारला, असा अर्थ होतं नसल्याचं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं नोंदवलं आहे.

काय आहे प्रकरण : गडचिरोली जिल्हा जात पडताळणी समितीनं एका अनुसूचित जातीच्या मुलीला इतर मागासवर्गीय जातीचं प्रमाणपत्र दिलं होतं. याविरुद्ध या अल्पवयीन मुलीनं न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयानं हा निर्णय दिला. आता न्यायालयानं जात पडताळणी समितीला आदेशाच्या तारखेपासून दोन आठवड्यांच्या आत या मुलीला 'महार' या अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र देण्यास सांगितलंय.

घराच्या पाहणीत येशू ख्रिस्ताचा फोटो दिसला : उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण आणि न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. या अल्पवयीन मुलीनं तिच्या वडिलांमार्फत ही याचिका दाखल केली होती. दाखल याचिकेत म्हटलं होतं की, येशू ख्रिस्ताचा हा फोटो त्यांना भेट देण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी तो घरात लावला. दक्षता समितीनं मुलीच्या घराची पाहणी केली तेव्हा त्यांना हा फोटो दिसून आला होता.

न्यायालयाचं निरीक्षण : 'घरात येशू ख्रिस्ताचा फोटो आहे म्हणून एखाद्या व्यक्तीनं स्वत: ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे यावर कोणताही विचारी व्यक्ती विश्वास ठेवणार नाही. दक्षता कक्षाच्या अधिकाऱ्यांना केवळ याचिकाकर्त्याच्या घरी भेटीदरम्यान येशू ख्रिस्ताचा फोटो दिसल्यानं त्यांनी गृहीत धरलं की हे कुटुंब ख्रिश्चन धर्माचं पालन करतं', असं खंडपीठानं नमूद केलं. या मुलीनं १२ वीची परीक्षा उत्तीर्ण केली असून तिनं बौद्ध धर्माचा अभ्यास करणारा असल्याचे सांगत महार जातीच्या प्रमाणपत्राची मागणी केली होती.

हेही वाचा :

  1. Mumbai HC On Pakistani Artist : पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली
  2. Bombay High court News : बलात्कार पीडितेच्या 29 आठवड्यांच्या गर्भपाताला मंजुरी, मुंबई हायकोर्टाचा निर्णय
  3. Bombay High Court News: महिलांनी लहान स्कर्ट घालून उत्तेजक हातवारे करून नाचणं म्हणजे अश्लीलता नाही, नागपूर खंडपीठाचं निरीक्षण

ABOUT THE AUTHOR

...view details