महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कुर्ल्यात प्रवासी महिलेवर सामूहिक बलात्कार; चार आरोपींना अटक

कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनसवरून मध्य प्रदेशला जाण्यास निघालेल्या महिलेचा टिळक टर्मिनस येथे निर्जनस्थळी नेत चार जणांनी तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिचे पैसे आणि दागिने देखील लुटले.

kurla crime news
बलात्कार करणाऱया आरोपींना अटक

By

Published : Jan 21, 2020, 2:16 PM IST

Updated : Jan 21, 2020, 2:38 PM IST

मुंबई- कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनसवरून मध्य प्रदेशला जाण्यास निघालेल्या महिलेचा टिळक टर्मिनस येथे निर्जनस्थळी नेत चार जणांनी तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिचे पैसे आणि दागिने देखील लुटल्याची घटना सोमवारी रात्री साडेदहा वाजता घडली. याप्रकरणी नेहरूनगर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

कुर्ल्यात प्रवासी महिलेवर सामूहिक बलात्कार

हेही वाचा -मुंबईत अमेरिकन नागरिकांना लुबाडणाऱ्या कॉल सेंटरवर पोलिसांची कारवाई

पीडित महिला ही रात्री कुर्ला रेल्वे स्थानक येथे उतरून कटने, मध्य प्रदेश येथे जाण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पायी जात होती. यावेळी साबळेनगर येथील झाडीमध्ये लघुशंकेसाठी गेली असता, त्याठिकाणी आरोपी सोनू तिवारी आणि निलेश बारसकर हे आधीपासूनच झाडीपलीकडे उभे होते. त्यांनी महिलेस झाडीत ओढून तिच्यावर बलात्कार केला. ही घटना घडत असतानाच आरोपी सिद्धार्थ वाघ आणि श्रीकांत भोगले तेथून आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांनी देखील या महिलेवर बलात्कार केला.

हेही वाचा -'...तरच खऱ्या अर्थाने राज्याचा विकास होऊ शकतो'

तसेच पीडित महिलेचे रोख 3 हजार रुपये आणि मंगळसूत्र खेचून पळून जात असताना, त्या रस्त्याने जाणाऱ्या महिलेने मदतीसाठी 100 क्रमांकावर फोन केला. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचून लोकांच्या मदतीने दोन आरोपींना लगेच अटक केली. तर, आज पहाटे दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र, 12 तासांच्या आतच पोलिसांनी चारही आरोपींना बेड्या ठोकल्या.

Last Updated : Jan 21, 2020, 2:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details