मुंबई -अभिनेता पर्ल पूरी याला अत्याचाराच्या आरोपाप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मुंबई वालीव पोलिसांनी ही कारवाई केली. त्याच्यावर त्याच्या एका महिला सहकलाकाराच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.
नागीन फेम अभिनेता पर्ल पुरीला अटक, १७ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याबाबत कारवाई - पीडितेवर अत्याचार
एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नागीन फेम अभिनेता पर्ल पुरीसह सात जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आणखी चौकशी करण्यात येत आहे. काही सबळ पुरावे आढळून आल्याने पर्लला अटक करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
पर्ल पुरी
अभिनेता पर्ल पूरी याने 'बेपनाह प्यार', 'नागिन 3', 'फिर भी न माने बतमीज दिल' यासह अनेक हिंदी मालिकांमध्ये अभिनय केला आहे. याबाबत पीडितेच्या मुलीने वालीव पोलिसांत तक्रार दाखल दिली आहे. यानंतर वालीव पोलिसांनी आयपीसीच्या कलम 376 तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा -पी 305 बार्जवरील कॅप्टनचा मृत्यू; ओळख पटल्यावर म़तदेह कुटुंबीयांकडे सुपूर्द
Last Updated : Jun 5, 2021, 6:11 PM IST